आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Farmer Don't Commit Suicide Say State Minister Shinde

शेतकऱ्यांनी आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेऊ नये : गृहराज्यमंत्री शिंदे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - गेल्याकाही महिन्यांपासून नगर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. भाजप सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी हजार कोेटींचे पॅकेज दिले आहे. त्याचा लाभ तळागाळातील शेतकऱ्यांना होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेऊ नये, असे आवाहन गृह राज्यमंत्री राम शिंदे यांनी शुक्रवारी केले.
पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या नूतन इमारतीची पाहणी केल्यानंतर शिंदे बोलत होते. शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी पोलिस अधिकाऱ्याला केलेल्या मारहाणीबाबत विचारले असता शिंदे म्हणाले, कोणत्याही लोकप्रतिनिधीला असा प्रकार शोभत नाही. या प्रकाराची माहिती घेऊन चौकशी केली जाईल. जवखेडे तिहेरी हत्याकांड हे पोलिस दलाला आव्हान होते. विशेष पोलिस महानिरीक्षक साळुंके यांनी काही आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणाचा सखोल तपास केला जाईल, असे त्यांनी सांगितले.

राज्यातील बहुतांश पोलिस वसाहतींची दुरवस्था झाली आहे. सार्वजनिक बांधकामच्या सहकार्याने या वसाहतींचे रुप पालटले जाईल. सायबर गुन्ह्यांच्या सखोल तपासाकरिता पोलिस दलाला सक्षम करण्यावर भर दिला जाईल. पाकिस्तानातील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात सतर्कतेचे आदेश दिले आहेत, असेही शिंदे यांनी सांगितले.
पर्यटनआराखडा

पर्यटनविकास आराखडा तयार करण्यात येणार असल्याची माहिती िशंदे यांनी शासकीय िवश्रामगृहावर पत्रकारांशी बोलताना दिली. ते म्हणाले, ग्रामीण भागाला चांगले रस्ते मिळावेत, यासाठी राज्यात सडक योजना राबवण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या दुष्काळी पॅकेजचा फायदा सर्व गावांना मिळावा, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. दुष्काळग्रस्त गावांमध्ये पाण्याचे उद््भव, वीजबिल असे प्रश्न आहेत. आरोग्य विभागाशी संबंधित अनेक प्रश्न आहेत. नागरिकांना आरोग्याच्या चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी पुढच्या आठवड्यात आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येणार आहे. राजीव गांधी जीवनदायी योजनेतील अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील. निळवंडे, वांबोरी चारी प्रश्नाला प्राधान्य देऊ. नगर-िशर्डी रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. त्याचा त्रास भाविकांना होतो. हा रस्ता तातडीने दुरुस्त करण्यासाठी प्रयत्न केले जातील. नागपूर येथील हिवाळी अधिवेशन संपण्यापूर्वी पालकमंत्र्यांची घोषणा केली जाईल, असेही शिंदे यांनी सांगितले.