आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पावसाचा दगा, खरीप हंगाम धोक्यात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - अपुर्‍या पावसावर पुढील आशा ठेवून तालुक्यातील शेतकर्‍यांनी 13 हजार 822 हेक्टर क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्या केल्या, पण पावसाने दगा दिल्याने संपूर्ण खरीप हंगामच धोक्यात आला आहे.

जून महिन्यात दडी मारलेल्या पावसाने जुलैच्या सुरुवातीला काही प्रमाणात हजेरी लावली. अत्यल्प पावसावरही शेतकर्‍यांनी पेरणी केली. मुगाची पेर बहुतांशी वाया गेल्याने, बाजरी, सोयाबीन, कापूस, तूर या पिकांकडे शेतकर्‍यांचा कल दिसून आला. तालुक्यांतील 22 हजार 500 हेक्टर क्षेत्रापैकी 13 हजार 822 हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेर झाली. जवळपास 65 टक्के झालेली पेर मात्र, पावसाअभावी आता धोक्यात आली आहे. .जून व जुलै महिन्यात मिळून सरासरीच्या अवघा 47 टक्केच पाऊस झाला आहे श्रावण सरीही कोठे झडताना दिसत नाहीत. पाऊस नसल्याने पिकांनी माना टाकण्यास सुरुवात केली आहे. येत्या दोन-चार दिवसांत पाऊस न आल्यास संपूर्ण खरीप हंगामच वाया जाण्याची शक्यता आहे.