आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संतप्त शेतकर्‍यांचा कर्जतमध्ये रास्ता रोको

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- कर्जत तालुक्यातील सीतपूर येथे सुरू असलेल्या जनावरांच्या छावणीला शासकीय नियमानुसार परवानगी देऊन अनुदान मंजूर करण्यात यावे, या मागणीसाठी बाजार समितीचे माजी उपसभापती अशोक खेडकर यांच्या नेतृत्वाखाली संतप्त शेतकर्‍यांनी बुधवारी कर्जत-जामखेड मार्गावर रास्ता रोको आंदोलन केले.

दोन दिवसांत छावणी मंजूर करण्याचे लेखी आश्वासन नायब तहसीलदार सुरेश तनपुरे यांनी दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. या आंदोलनात जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण समितीचे माजी सभापती रामदास चौगुले, राष्ट्रवादीचे रघुनाथ काळदाते, शिवसेनेचे बाळासाहेब कसाब, गोविंद देवकाते, राजेंद्र शिंदे, सुदाम गायकवाड, नवनाथ जगताप, नानासाहेब खोटे, तसेच बैल व गाड्यांसह शेतकरी व पशुपालक मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. सकाळी साडेनऊ वाजता हे आंदोलन सुरू झाले. सुमारे अडीच तास चाललेल्या या आंदोलनामुळे कर्जत - जामखेड रस्त्याच्या दुतर्फा गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.