आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेती महामंडळ व पालिकेचे साटेलोटे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीरामपूर - नियोजित आराखड्यात आरक्षण नसतानाही पालिकेने श्रीरामपूर व दत्तनगर येथील खंडकरी शेतक-यांना जमीन मिळू नये म्हणून शेती महामंडळाच्या ताब्यात असलेल्या क्षेत्रावर आरक्षण टाकले आहे, असा आरोप करून जमीन वाटप वेळेत न केल्यास उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करू, असा इशारा शेतकरी संघटनेने दिला आहे.

तालुकाध्यक्ष जितेंद्र भोसले यांनी प्रांताधिका-यांना निवेदनात म्हटले आहे, शेती महामंडळाचा उद्देश शेती करण्याचा असताना ज्या जमिनी पालिकेच्या हद्दीशेजारी आहेत. त्या एनए पोटेंशिअल असल्याचे कारण पुढे करून या जमिनी वाटपास टाळाटाळ करीत आहेत. पालिका घटनाबाह्य व पूर्वग्रहदूषित हेतूने आरक्षण टाकू शकत नाही. जमीन वाटप प्रक्रियेत राजकीय हस्तक्षेप होत आहे. खंडकरी व त्यांच्या वारसांना अतिक्रमित जमिनी वाटप करायचे असताना बेलापूर येथील अतिक्रमण काढण्यासाठी कुठलीही कार्यवाही झालेली नाही, असेही निवेदनात म्हटले आहे.

आरक्षण नियमानुसार...
- शहर विकास रचनेचा आराखडा 1991 मध्ये तयार करण्यात आला आहे. त्यानुसार नियमातच शेती महामंडळाच्या जमिनीवर आरक्षण टाकण्यात आले आहे. ’’ संतोष खांडेकर, मुख्याधिकारी.