आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उसाचे क्षेत्र यंदा घटणार , लांबलेल्या पावसाचाही ऊस लागवडीला फटका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - विविधअडचणींचा सामना करूनही गेल्या वर्षी जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी विक्रमी गाळप केले. मात्र, यंदा लांबलेल्या पावसाने ऊसलागवडीच्या क्षेत्रात घट होण्याची शक्यता आहे. सध्या लागवड सुरू असलेल्या आडसाली उसाच्या क्षेत्रात घट नोंदवली असून पाऊस कमी प्रमाणात झाल्यास हंगामी पूर्व हंगामी उसाचे क्षेत्र घटणार आहे.

राज्याच्या एकूण ऊस गाळप साखर उत्पादनात जिल्ह्याचा दहा टक्क्यांपेक्षा अधिक वाटा आहे. गेल्यावर्षी दुष्काळाचे सावट असतानाही, तसेच जून महिना कोरडा गेल्याने चा-यासाठी उसाचा वापर होऊनही जिल्ह्यातील कारखान्यांनी विक्रमी गाळप केले. सुमारे कोटी २० लाख टन उसाच्या गाळपातून गेल्या हंगामात कोटी ३२ लाख क्विंटलपेक्षा अधिक साखरेचे विक्रमी उत्पादन झाले. गेल्या पाच वर्षांपासून अनियमित कमी पावसाला जिल्ह्याला तोंड द्यावे लागत असतानाही विक्रमी गाळप झाले. खासगी साखर कारखान्यांची वाढलेली क्षमता काही प्रमाणात शेजारील जिल्ह्यातून उपलब्ध झालेल्या उसातून ही कामगिरी शक्य झाली.

जिल्ह्यात साधारणत: लाख १७ हजार ६६१ हेक्टर क्षेत्रावर ऊसलागवड होते. जून, जुलै महिन्यांत आडसाली ऊसलागवड होते, तर त्यानंतर सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यांत हंगामी उसाची लागवड होते. जानेवारी-फेब्रुवारीत पूर्व हंगामी ऊस लावला जातो. यंदा हजार ३७८ हेक्टर क्षेत्रावर आडसाली उसाची लागवड आतापर्यंत झाली आहे. नेवासे तालुक्यात सर्वाधिक ८२७ हेक्टर क्षेत्रावर आडसाली उसाची लागवड झाली. त्यानंतर राहुरी, श्रीरामपूर तालुक्यांचा क्रमांक लागतो. पारनेर, शेवगाव, पाथर्डी, अकोले, कोपरगाव या तालुक्यांमध्ये आडसाली उसाची यंदा लागवडच झाली नसल्याचे कृषी विभागाने दिलेल्या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. नगर, जामखेड, संगमनेर राहाता तालुक्यात सरासरीच्या तुलनेत आडसाली उसाची नगण्य लागवड झाली आहे.

श्रीगोंदे श्रीरामपूर तालुक्यात उसाचे सरासरी लागवड क्षेत्र जास्त आहे. दोन्ही तालुक्यांत प्रत्येकी १५ हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर ऊसलागवड होते. मात्र, यंदा दोन्ही तालुक्यांत मिळून ५०० हेक्टर क्षेत्रावर आडसाली उसाची लागवड झाली आहे. दरवर्षी गाळपासाठी उपलब्ध होणा-या उसापैकी जवळपास ५० ते ६० टक्के ऊस खोडव्याचा असतो. यंदाही खोडव्याच्या उसाचे प्रमाण अधिक राहणार आहे.
जिल्ह्यातील बहुतांश उसाच्या क्षेत्राला धरणाच्या पाण्यातूनच सिंचन होते. भंडारदरा, मुळा, कुकडी धरण गोदावरी नदीच्या पाण्याचा यात समावेश आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा धरणातील उपलब्ध उपयुक्त पाणीसाठा अधिक आहे. मात्र, हा साठा पिण्याच्या पाण्यासाठी पुरेल इतपतच आहे. त्यामुळे लाभक्षेत्रात सध्या चिंतेचे वातावरण आहे. धरणांत मुबलक पाणीसाठा झाला, तरच लाभक्षेत्रात ऊस लागवड शक्य होणार आहे.

उसावर अर्थकारण
नगरजिल्ह्याचे अर्थकारणच ऊस कारखानदारीवर अवलंबून आहे. शहराच्या औद्योगिक वसाहतीतील जवळपास ३० टक्के उद्योग या कारखानदारीशी संबंिधत उत्पादनाशी जोडलेले आहेत. ऊस उत्पादनात घट होणार असल्याने अर्थकारणासोबतच उद्योगांवरही परिणाम होईल.

पाऊस लांबल्याने घट
पाऊसलांबल्याने यंदा ऊसलागवडीत घट झाली आहे. बहुतांशी सिंचन धरणावर अवलंबून असल्याने धरणातील पाणीसाठ्यावर हंगामी पूर्व हंगामी ऊसलागवडीचे क्षेत्र कमी-अधिक ठरणार आहे. यंदा ऊस उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.'' अंकुशमाने, जिल्हाअधीक्षक कृषी अधिकारी, नगर.

कर्जाबाबत भीक नको...
मागीलगळीत हंगामातील थकीत एफआरपी (किमान किफायतशीर दर) अदा करण्यासाठी साखर कारखान्यांना बिनव्याजी कर्ज सध्या उपलब्ध करून देण्यात आले आहे. मात्र, या कर्जासाठी कारखान्यांच्या संचालकांची मालमत्ता तारण ठेवण्याची, तसेच फक्त एकच वर्ष बिनव्याजी कर्ज मिळणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे या कर्जातून जिल्ह्यातील शेतक-यांची पावणेतीनशे कोटींची थकबाकी मिळण्याची शक्यता धूसर झाली आहे.
पावसाने ओढ दिल्याने सध्या येथील बाजार समिती कार्यालयात चा-यासाठी मोठ्या प्रमाणात उसाची आवक होत आहे. साधारणत: प्रति टन दीड ते दोन हजार रुपये दराने या उसाची विक्री होत आहे. त्यामुळे उपलब्ध उसामध्येही घट होत आहे.

आकडे बोलतात
उसाचेक्षेत्र : लाख१८ हजार हेक्टर
गतवर्षीचे गाळप : कोटी२० लाख टन
उत्पादन: कोटी३२ लाख क्विंटल
साखरउतारा :११.०३ टक्के
एकूणकिंमत : २३१५कोटी
शेतक-यांना: २०३६कोटी
थकबाकी: २७९कोटी
बातम्या आणखी आहेत...