आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरमध्‍ये 35 दिवसांत 19 शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कर्जमाफीच्या संभ्रमामुळे वाढ झाल्‍याची शक्‍यता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- विधानसभेतीलविरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचा जिल्हा असलेल्या जेथे ऐतिहासिक शेतकरी संपाला सुरुवात झाली, त्या नगर जिल्ह्यात गेल्या ३५ दिवसांत १९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यातील बहुतांशी शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून जीवन संपलले.
मे व जून महिन्यातील ६० दिवसांत ३० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. विशेष म्हणजे गेल्या चार दिवसांत तब्बल सहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. कर्जमाफीतील जाचक अटी राज्य सरकार दिवसेंदिवस कर्जमाफीच्या निर्णयात करत असलेल्या बदलांमुळे या आत्महत्या झाल्याची चर्चा आहे.
 
शेतकरी कर्जमाफीसाठी पुणतांबे येथील शेतकऱ्यांनी जूनपासून संप पुकारला होता. इतिहासात प्रथमच शेतकरी संपावर गेले होते. संप सुरु होण्यापूर्वी राधाकृष्ण विखे यांच्या मध्यस्थीने पुणतांबे येथील शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत बैठक झाली होती. मुंबईत रात्री उशिरापर्यंत चाललेल्या बैठकीनंतर संप मागे घेतल्याचे जाहीर करण्यात आले, तरीदेखील जूनपासून शेतकऱ्यांनी संप सुरू केला. सहा दिवस हा संप चालला. संपामुळे कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कोट्यवधींचे व्यवहार ठप्प झाले होते. या संपाची धार पुढे वाढत गेली. संपूर्ण राज्यभर संपाचे लोण पसरले.
 
शेतकऱ्यांच्या संपामुळे धास्तावलेल्या सरकारने अखेर कर्जमाफीची घोषणा केली. २८ जूनला कर्जमाफीचा शासननिर्णय झाला. १४ जूनला शेतकऱ्यांनी खरिपासाठी १० हजार रुपयांचे कर्ज देण्याच्या निर्णय झाला. जुलै या निर्णयात पुन्हा दुरुस्ती करण्यात आली. कर्जमाफीच्या निर्णयात पुन्हा जुलैला दुरुस्ती करण्यात आली. १४ जूनच्या कर्जमाफीच्या निर्णयात वारंवार बदल होत गेले. कर्जमाफीचा निर्णय झाला, मात्र अद्याप त्याची अंमलबजावणी झालेली नाही. प्रशासकीय स्तरावर शेतकरी कर्जमाफीसाठी याद्या संकलनाचे कामच सुरु आहे.
 
जिल्ह्यातील सुमारे लाखांहून अधिक शेतकऱ्यांवर कर्ज आहे. कर्जमाफीच्या निर्णयात सरकार वारंवार बदल होत असल्याने कर्जमाफीबद्दल शेतकऱ्यांपासून जिल्हा प्रशासन, बँकांतदेखील मोठा संभ्रम आहे. कर्जमाफीचे निकष बदलत असल्यामुळे कर्जमाफी मिळेल की नाही, याची खात्री नसल्याने शेतकरी अस्वस्थ आहेत. त्यातही गेल्या महिन्याभरापासून पावसाने पाठ फिरविल्याने खरीप हंगाम धोक्यात आला आहे. जिल्ह्यात लाख ७८ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत, मात्र पावसाअभावी पिके सुकत आहेत. पावसाने आेढ दिल्याने केलेला खर्च वाया जात आहे. कर्जमाफीबाबत शेतकरी संभ्रमात असताना निसर्गानेही साथ सोडली आहे. रखडलेली कर्जमाफी पावसाने दिलेली आेढ यामुळे शेतकरी आत्महत्यांत वाढ झाल्याची चर्चा आहे.

नगर जिल्ह्यात जुलै ते अॉगस्टपर्यंत १९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. या १९ आत्महत्या गेल्या ३५ दिवसांत झाल्या असून, त्यातील सहा शेतकऱ्यांच्या आत्महत्या गेल्या चार दिवसांतील आहेत. हे सहाही शेतकरी श्रीगोंदे तालुक्यातील आहेत. चार दिवसांत श्रीगोंदे येथील सुरेश शेटे, शिपलकरवाडी येथील सुरेश गायकवाड, श्रीगोंदे तालुक्यातीलच विठ्ठल ससाणे, पोपट राक्षे, अजनुज येथील सुरेश गायकवाड संतोष कदम या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. जुलै महिन्यात पाथर्डी, संगमनेर, कर्जत, जामखेड या तालुक्यातील १३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.
 
नगर जिल्ह्यात २००३ ते १६ पर्यंत ४६५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यातील २५९ शेतकऱ्यांनी कर्जबाजारीलापणाला कंटाळून आत्महत्या केल्या आहेत. विशेष म्हणजे २०१०-११ मध्ये जिल्ह्यात दुष्काळाची गंभीर स्थिती होती. तरीदेखील या दोन वर्षात केवळ १३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या.

सरकारच्या निर्णयावर विश्वास नाही
आंदोलनाचा जोरकमी होताच सरकारने आपला शब्द फिरवला. सरकारने सरसकट कर्जमाफीऐवजी अनेक शर्ती अटी कर्जमाफीत घातल्या. परिणामी ऐतिहासिक कर्जमाफीऐवजी शेतकऱ्यांची ऐतिहासिक फसवणूक झाली. शेतकऱ्यांचा या सरकारच्या धोरणावर विश्वास राहिला नाही. म्हणूनच शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र सुरु आहे. शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यापासून रोखण्यासाठी सरकारने कर्जमाफीच्या निर्णयात लादलेल्या जाचक अटी शर्ती तातडीने मागे घेऊन सरसकट कर्जमाफी द्यावी. सुकाणू समिती शेतकऱ्यांना आवाहन करते आहे की, आत्महत्या हा उपाय नसून, अन्यायविरुध्द संघर्ष करण्यासाठी आंदोलनात उतरावे.'
- डॉ. अजित नवले, समन्वयक.
 
सर्वाधिक आत्महत्या गेल्या वर्षी
गेल्यातेरा वर्षांत सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या २०१६ या वर्षात झाल्या. नगर जिल्ह्यात २००३ पासून शेतकरी आत्महत्या सुरु झाल्या होत्या. सर्वाधिक १४४ आत्महत्या २०१६ मध्ये झाल्या. २०१५ मध्ये ११८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. गेल्या दोन वर्षांत शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या. गेल्या तेरा वर्षांत कुठल्याही वर्षी ४९ पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या जिल्ह्यात झाल्या नव्हत्या. मात्र, गेल्या वर्षी १४४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. जानेवारी ते ऑगस्ट २०१७ पर्यंत ९४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून, त्यातील ३७ शेतकरी सरकारी मदतीसाठी पात्र ठरले आहेत, तर ३६ अपात्र ठरले होते. ३७ शेतकऱ्यांना सरकारी मदत देण्यात आली आहे.
बातम्या आणखी आहेत...