आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाने दडी मारल्याने शेतकर्‍यांच्या चिंतेत भर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - पावसाने गेल्या पंधरा दिवसांपासून दडी मारल्याने खरिपाची पिके जळू लागली आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांसमोर आता नवे संकट उभे राहिले आहे.

सलग दोन वर्षे पाऊस न झाल्याने जामखेड, कर्जत, पाथर्डी, शेवगाव, कर्जत, श्रीगोंदे व पारनेर या तालुक्यांत दुष्काळी स्थिती होती. मात्र, जूनच्या प्रारंभापासून पावसाने दमदार हजेरी लावली. मागील पंधरा दिवसांपासून मात्र पावसाने ओढ दिल्याने पिके जळू लागली आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 4 हजार 636 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस अकोले तालुक्यात 555 मिलिमीटर झाला आहे. संगमनेर - 265, कोपरगाव - 294, श्रीरामपूर - 299, राहुरी - 252, नेवासे - 259 राहाता - 361 नगर - 302 शेवगाव - 363 पाथर्डी - 294 पारनेर - 286, कर्जत - 282, श्रीगोंदे - 311 व जामखेडमध्ये 411 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

मागील काही दिवसांपासून पावसाने जिल्ह्याकडे पाठ फिरवली आहे. पावसाने विर्शांती घेतल्याने शेतकरी वर्गही चिंतेत सापडला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत खरिपाची 130 टक्के पेरणी झाली असली तरी पावसाने दडी मारल्याने पिके जळण्याचा धोका निर्माण झाला आहे. नगर शहराला पाणीपुरवठा करणार्‍या मुळा धरणात शनिवारी 19 हजार 647, तर भंडारदरा धरणात 10 हजार 879 दशलक्ष घनफूट पाणीसाठा होता.