आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऊस दरासाठी ठिकठिकाणी आंदोलन सुरूच; पैठणमध्ये गोळीबाराविरोधातील बंदला प्रतिसाद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद/अहमदनगर- ऊस दरासाठी स्वाभिमानी संघटना आक्रमक झाली असून सर्व कारखानदारांनी दर जाहीर करावा अशी मागणी संघटनेने केला आहे. राहुरी तालुक्यात उसाला 3100 भाव मिळावा, यासाठी शेतकरी संघटनेने रास्ता रोको आंदोलन सुरु केले आहे. अहमदनगर येथे प्रादेशिक सहसंचालकांच्या कार्यालयात शेतकऱ्यांचे आंदोलन झाले. सुकाणू समितीचे समन्वयक डॉ.अजित नवलेंच्या नेतृत्वात शेतकरी संघटना व सुकाणू समितीने हे आंदोलन केले. पैठणमध्ये शेतकऱ्यांवर झालेल्या गोळीबाराच्या विरोधात आयोजित बंदला चांगला प्रतिसाद मिळत असून बाजारपेठेत शुकशुकाट पसरला आहे. 


या आंदोलनामुळे महामार्गाच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. शेतकऱ्यांनी इतर वाहने सोडून फक्त उसाच्या ट्रक अडविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा सुमारे 200 उसाच्या ट्रक अडविण्यात आल्या आहेत.


राहुरी तालुक्यात उसाचे क्षेत्र मोठे आहे़ या भागातून मोठ्या प्रमाणात ऊस कारखान्यांना जातो़ मात्र, कारखान्यांकडून अपेक्षित भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. गुरुवारी सकाळी राहुरीजवळील गुहा येथे नगर-मनमाड महामार्गावर शेतकरी संघटनेने रास्ता रोको आंदोलन सुरु केले आहे. यात शेकडो शेतकऱ्यांनी सहभाग घेत उसाच्या ट्रक अडविण्यास प्रारंभ केला आहे.

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...