आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1 जूनपासून राज्यातील शेतकरी संपावर, अहमदनगरमधील बैठकीत शेतकऱ्यांचा निर्धार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिर्डी - सर्वच शेतमालांचे भाव गडगडले आहेत. केंद्र व राज्य सरकारची चुकीची धोरणे त्याला कारणीभूत असल्याचे सांगत पुणतांबा येथे झालेल्या राज्यव्यापी बैठकीत शेतकऱ्यांनी १ जूनपासून संपावर जाण्याचा निर्धार केला.
 
विशेष म्हणजे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह पुणतांबा येथील शेतकरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले होते. त्यानंतर शेतकऱ्यांचा संप स्थगित झाल्याचेही सांगण्यात येत होते. त्या पार्श्वभूमीवर सोमवारी पुणतांबा येथील मुक्ताई मंदिराच्या सभागृहात किसान क्रांतीची राज्यव्यापी बैठक झाली. या बैठकीत हा निर्धार करण्यात आला.
 
शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील म्हणाले की, द्राक्षे, कांदा, चिकू, मिरची, संत्र्यासह सर्वच मालांचे भाव उतरले आहेत. शासनाने शेतमालाला हमी भाव दिला पाहिजे. निर्यातबंदी उठवली पाहिजे. शेतकऱ्यांच्या संपात वेगवेगळ्या संघटना असल्या तरी शेतकरी डोळ्यासमोर ठेवूनच या आंदोलनात सर्वांनी उतरावयाचे आहे. संप फोडण्याचा कोणी स्टंट केला तर शेतकरी त्यांना माफ करणार नाहीत, असा इशारा शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख सुहास वहाडणे यांनी दिला.
 
पुढील स्‍लाइडवर पाहा, बैठकीचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...