आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पशुधन विकण्याची शेतक-यांवर वेळ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - पाऊस समाधानकारक होईल, या आशेवर शेतक-यांनी मान्सूनपूर्व पावसाच्या ओलीवर खरिपाच्या पेरण्या केल्या. उगवण झाली, पण पावसाने पाठ फिरवली. भेगाळलेल्या रानात माना टाकून शेवटच्या घटका मोजणारे पीकही आठवडाभरात वाया जाईल. दुधाचे घसरलेले दर पाऊस नसल्याने महागलेला चारा या दृष्टचक्रात अडकलेला बळीराजा गोंधळून गेला आहे. पशुपालकांनी अवघ्या तीन महिन्यांत २५ हजार जनावरे घोडेगावच्या बाजारात विक्रीसाठी आणल्याचे वास्तव समोर आले. गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने जनावरांच्या विक्रीसही फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

जूनच्या सुरुवातीला जोरदार सरी बरसल्याने मान्सूनबाबत खात्री वाटू लागली. पहिल्याच पावसात हुरळून गेलेल्या शेतकऱ्यांनी दर्जेदार वाणाच्या बियाणांसाठी मोठी गुंतवणूक केली. पण महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने संपूर्ण खरीप हंगाम धोक्यात आला असून दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. मशागत पेरणीसाठी केलेला खर्च वाया जाऊन दुबार पेरणी करावी लागल्यास उत्पादन खर्च दुप्पट होईल. त्या तुलनेत उत्पन्न कमी होण्याची शक्यताच अधिक. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत.

शेतीला जोडधंदा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दूधधंद्यालाही घरघर लागली आहे. चाऱ्याचे भाव दिवसेंदिवस गगनाला भिडत असून ऊस प्रतिटन २२००, तर वैरण १६०० रुपये शेकडा झाली आहे. घास जनावरांच्या इतर खुराकाचेही भाव वाढले, पण दुधाचे भाव वाढण्याऐवजी घसरत आहेत. पशुपालकांनाही उत्पन्नाच्या तुलनेत खर्च अधिक येऊ लागल्याने त्यांनीही जनावरे विक्रीसाठी काढली आहेत.

नेवासे तालुक्यातील घोडेगाव येथे २५ एकरांत भरणाऱ्या जनावरांच्या बाजाराची "दिव्य मराठी'ने शुक्रवारी पाहणी केली. हा बाजार राज्यात प्रसिद्ध आहे. पशुपालकांबरोबरच जनावरांचे व्यापारीही चिंतातूर दिसले. जर्सी, होस्टेन गायी, म्हशी, रेडे, बैल, शेळ्या, मेंढ्या मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आल्या होत्या. चारा टंचाईमुळे पशुधन बाजारात आणल्याचे अनेक पशुपालकांनी सांगितले. बाजारात गायींची आवक वाढली असली, तरी चारा टंचाईमुळे खरेदी करणा-यांची संख्या घटली आहे. त्यामुळे गाय म्हशींचे भाव घसरले आहेत. एप्रिल ते जुलैदरम्यान बाजारात सुमारे २५ हजार जनावरे विक्रीसाठी आली. जिल्ह्यातील ठरावीक शेतकऱ्यांकडेच चारा आहे. दिवसें दिवस ओला सुका चारा चढ्या दराने खरेदी करावा लागत असल्याने सामान्य शेतक-यांची अडचण झाली आहे.

जनावरांचे भाव घसरले
गोवंशहत्याबंदीचा परिणाम जनावरांच्या खरेदी-विक्रीवर झाला आहे. त्यातच चाऱ्याचे वाढलेले भाव, घटलेली दुधाची किंमत हेदेखील भाव घसरण्याचे कारण मानले जाते. महिनाभरापूर्वी ६० ते ८० हजारांना विकली जाणारी जर्सी गाय आता ३० ते ६० हजारांवर आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह व्यापारीवर्गालाही फटका बसला आहे.

सदर आकडेवारी तिमाही आहे
दुष्काळाची पुनरावृत्ती
२०११-१२ मध्ये दुष्काळी स्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी बाजारात मोठ्या प्रमाणात पशुधन आले होते. तशीच स्थिती आज आहे.'' बाळासाहेबपारखे, बाजार समिती.

छावण्या सुरू करा
मीवारीत असलो, तरी १३ ला मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन. जनावरांसाठी छावण्या, दुधाचे घसरलेले दर उसासाठी पॅकेज यावर चर्चा करणार आहे.'' बबनरावपाचपुते, माजी मंंत्री.
३२५२ - गायी
४८२० - बैल
२५०३ - म्हशी
१७४ - रेडे
६६६५ - शेळ्या
७५८९ - मेंढ्या
१११ - घोडे

का आली ही वेळ?
सध्यागायीच्या दुधाला साडेपंधरा रुपये लिटर भाव मिळतो. गाय पंधरा लिटर दूध देणारी असेल, तर २५० ते २६० रुपये पशुपालकाला मिळतात. गायीची देखभाल, मजुरी, चारा, पाणी इतर खर्च विचारात घेता दिवसाला २५० ते ३०० रुपये खर्च येतो. त्यामुळे शेतकऱ्यांना दूधधंदा परवडत नाही.
बातम्या आणखी आहेत...