आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यातील संतप्त शेतक-यांनी रस्त्यावर ओतले दूध आणि कांदे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(दूध कांद्याला उत्पादन खर्चावर आधारित दर देण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटना दूध उत्पादक संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दूध कांदा रस्त्यावर ओतून आंदोलन करताना आंदोलक. छाया: उदय जोशी)
नगर - राज्यातदूध कांद्याचे दर मोठ्या प्रमाणावर घसरल्याने शेतकंच्या हाती उत्पादन खर्चही पडणेही अशक्य झाले आहे. दूध कांद्याला उत्पादन खर्चावर आधारित दर मिळावा, अशी मागणी करत दूध उत्पादक संघर्ष समिती शेतकरी संघटनेकडून बुधवारी जिल्ह्याधिकारी कार्यालयासमोर दूध कांदा ओतून आंदोलन करण्यात आले.

दूध उत्पादक समितीचे कॉम्रेड डॉ. अजित नवले, शेतकरी संघटनेचे बाळासाहेब पठारे, सुभाष लांडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. संतप्त शेतकंनी जिल्ह्याधिकारी कार्यलयासमोर सरकारच्या विरोधात घोषणा देत दूध कांदे रस्त्यावर ओतले. गायीच्या दूधाला २६ रुपये म्हशीच्या दुधाला ३९ रुपये प्रतिलिटर उत्पादन खर्च येतो. स्वामीनाथन समितीच्या शिफारशींप्रमाणे त्यावर ५० टक्के नफा गृहित धरल्यास गाईच्या दुधाला प्रतिलिटर ३९ म्हशीच्या दुधाला ५१ रुपये हमीभाव मिळणे अपेक्षित आहे. मात्र, सध्या दूध कांद्याचे दर कमालीचे पडले आहेत. त्यामुळे शेतकंच्या तोंडचे पाणी पळाले असल्याने दूध कांद्याला योग्य हमीभाव देण्याची मागणी आंदोलकांनी केली.
आंदोलकांनी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांना निवेदन देऊन आपले गाऱ्हाणे मांडले.
यावेळी शांताराम वाळूंज, सुरेश भोर, रुपेद्र काले, बच्चू मोढवे, बन्सी सातपुते, राजू आघाव, विश्वास लांके, आर. डी. चौधरी, महेबूब सय्यद, अर्शद शेख, संजय पोटे, बाळासाहेब पाटील, संजय गाडे, अनिल इंगळे, नामदेव भांगरे, अनिल कडणे, बापू राशीनकर, अशोक सब्बन आदी उपस्थित होते.
आंदोलनात शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्याने गळ्यात अशा कांद्याच्या माळा घातल्या.

कांद्यावरील निर्यातबंदी लगेच उठवा
गायीच्या दुधाला प्रतिलिटर २६ रूपये उत्पादन खर्च येत असून भाव मात्र केवळ १६ रुपये मिळतो आहे. उत्पादकांना प्रतिलिटर दहा रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. १५ दिवसांत दुधाला योग्य भाव मिळाला नाही कांदा निर्यातबंदी उठवली नाही, तर रस्त्यावर उतरुन तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडू. याला सर्वस्वी सरकार जबाबदार असेल.'' बाळासाहेबपटारे, विभागीयअध्यक्ष, शेतकरी संघटना.