आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरकडे पावसाने फिरवली पाठ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - मागील आठवड्यापासून पावसाने पाठ फिरवल्याने जिल्ह्याच्या काही भागांतील पेरण्या रखडल्या आहेत. जिल्ह्यात बुधवारपर्यंत सरासरीच्या 151.60 टक्के पावसाची नोंद झाली. मागील 24 तासांत अकोल्यात 3, तर जामखेड तालुक्यात 2 मिलिमीटर पाऊस झाला.

यंदा 1 जूनपासून जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. 1 ते 30 जूनपर्यंत 1,899 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. हा पाऊस सरासरीच्या 27.28 टक्के होता. 1 ते 10 जुलैपर्यंत 2,122.4 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. आतापर्यंत सर्वाधिक 239 मिलिमीटर पावसाची नोंद राहाता तालुक्यात झाली. अकोले 180, संगमनेर 112, कोपरगाव 131, र्शीरामपूर 127, राहुरी 104, नेवासे 86.50, नगर 163, शेवगाव 144, पाथर्डी 133, पारनेर 145, कर्जत 200.2, र्शीगोंदे 190 व जामखेडमध्ये 163 मिलिमीटर पावसाची नोंद झाली.