आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यातील दीड लाख हेक्टर क्षेत्र पेरणीविना, पावसाअभावी मूग, उडीद, तूर पिके जळाली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - नगरशहर जिल्ह्यात तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर कमी झाला आहे. पाऊस थांबल्यानंतर काही भागात शेतकऱ्यांनी पुन्हा दुबार पेरण्या सुरु केल्या आहेत. शुक्रवार अखेरपर्यंत जिल्ह्यात ६४ टक्के खरीपाच्या पेरण्या झाल्या आहेत. जिल्ह्यात दीड लाख हेक्टर क्षेत्र अजूनही पेरणीविनाच आहे.

जिल्ह्यात जूनपासूनच मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाली होती. १५ जूनपर्यंत दमदार पाऊस झाला. त्यानंतर मात्र पाऊस थांबला होता. तब्बल दोन महिन्यांपासून पाऊस थांबल्याने खरीपाच्या पेरण्याही रखडल्या होत्या.आतापर्यंत लाख ७० हजार हेक्टर क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या झाल्या आहेत. पावसाअभावी अजूनही दीड लाख हेक्टरवर खरीपाच्या पेरण्या होऊ शकलेल्या नाहीत. गेल्या काही दिवसांपासून शहर परिसरात ढगाळ वातावरण होते. पाऊस नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले होते. मंगळवारी (४ ऑगस्ट) पहाटेपासून शहर जिल्ह्यात पावसाचे पुन्हा आगमन झाले.
प्रदीर्घ विश्रांतीनंतर पावसाचे आगमन झाल्यामुळे शेतकरीही सुखावला. जिल्ह्यात यावर्षी आतापर्यंत १५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक अकोले तालुक्यात ५३० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पाथर्डी तालुक्यात ७२ मिलिमीटर सर्वात कमी पावसाची नोंद झाली आहे.
तीन दिवस सलग पावसाचा जोर कायम होता. मात्र शनिवारपासून पाऊस थांबला आहे.पाऊस लांबल्यामुळे खरीपातील मूग, उडीद, तूर, कापूस, कडधान्य पीके जळून गेली आहेत. या आठवड्यात झालेल्या पावसामुळे जिल्ह्याच्या काही भागात शेतकऱ्यांनी पिकांवर नांगर फिरवून पुन्हा दुबार पेरणी सुरू केली आहे.

जिल्ह्याबाहेर चारा नेण्यास बंदी
टंचाईच्यापार्श्वभूमीवर प्रशासनाने आगामी काळात चारा टंचाई भासू नये, यासाठी लाख ५४ हजार ३३० मेट्रीक टन चारा पिकांचे नियोजन केले आहे. जिल्ह्यातून बाहेर चारा नेण्यास जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी बंदी घातली आहे.६ ऑगस्टपासून हे आदेश जारी करण्यात आले आहेत.

चारा डेपो, छावण्यांचे प्रस्ताव पाठवू
सध्याचाऱ्याची टंचाई नसली तरी भविष्यात चारा टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यापार्श्वभूमीवर चारा डेपो जनावरांच्या छावण्या सुरु करण्याबाबत प्रस्ताव तयार करण्याचे आदेश पालकमंत्री राम शिंदे यांनी दिले आहेत. जिल्ह्यात चारा डेपो छावण्या सुरू करण्याबाबतचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत होणार आहे.