आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्जत: मुलीची सतत छेड काढली जात असल्याने पित्याने केली विष पिऊन आत्महत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कर्जत (जि. नगर)- मुलीची सतत छेड काढली जात असल्याने कंटाळून पित्याने विष पिऊन आत्महत्या केल्याचा प्रकार कर्जत तालुक्यातील बाभूळगाव खालसा (जि. नगर) येथे घडला. पोपट मारुती पुराणे असे दुर्दैवी पित्याचे नाव आहे. संशयित आरोपी फरार मात्र आहेत.

२१ ऑगस्ट रोजी नववीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीची छेड काढल्याप्रकरणी बाभूळगावमधील केतन भाऊसाहेब लाढाने (वय १९) बाळू मोहन भालेराव (वय २०) या दोघांविरुद्ध पोलिसात तक्रार आली होती. या तक्रारीनंतरही आरोपी छेड काढत असल्याचे मुलीने पित्याला सांगितले. यासंदर्भात पोपट यांनी पुन्हा फिर्याद दिली. परंतु हा प्रकार सुरूच राहिल्याने सप्टेंबर रोजी पुराणे यांनी विषारी औषध प्राशन केले. नगर येथे उपचारादरम्यान मंगळवारी (६ सप्टेंबर) मध्यरात्री या पित्याचा मृत्यू झाला.
बातम्या आणखी आहेत...