आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फादर फलकाव ऑक्सफर्डला जाणार, "ख्रिस्तपुराण आणि संस्कृतीकरण' या विषयावर व्‍याख्‍यान देणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- "ख्रिस्तपुराण आणि संस्कृतीकरण' या विषयावर व्याख्यान देण्यासाठी नगर येथील सेंट जॉन्स चर्चचे धर्मगुरू फादर डॉ. नेल्सन फलकाव यांना इंग्लंडमधील प्रतिष्ठेच्या ऑक्सफर्ड विद्यापीठाने निमंत्रित केले आहे. ही व्याख्याने 25 ते 30 नोव्हेंबर या काळात आयोजित करण्यात आली आहेत.

फादर फलकाव यांनी ख्रिस्तपुराणाविषयी संशोधन व विपुल लेखन केले आहे. त्यांच्या पोस्ट डॉक्टरेट संशोधनावर आधारित मराठी व इंग्रजीतील ग्रंथ प्रकाशित असून जगभरातील अभ्यासकांचे लक्ष या ग्रंथांनी वेधून घेतले आहे.
फादर थॉमस स्टीफन्स यांच्या "ख्रिस्तपुराण' या ग्रंथाचा मराठी व इंग्रजी अनुवाद फादर फलकाव यांनी केला. ऑक्सफर्ड विद्यापीठाने त्यांना व्याख्यानांसाठी विशेष निमंत्रित केले आहे. पहिले व्याख्यान ब्लॅकफ्रायर्स हॉलमध्ये होणार आहे. या भेटीत ते एकूण दहा व्याख्याने विविध संस्था, महाविद्यालयांमध्ये देतील. ही व्याख्याने मुख्यत: उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी व संशोधन करणाऱ्यांसाठी असून ख्रिस्तपुराण आिण ख्रिस्तपुराणाचे कर्ते फादर थॉमस स्टीफन्स यांच्याविषयी या वेळी विस्तृत चर्चाही होणार आहे.
कोण होते स्टीफन्स?
परद्वीपावरून भारतात प्रथम आलेल्या इंग्रजांपैकी फादर स्टीफन्स होत. त्यांचे 1579 मध्ये भारतात आगमन झाले. गोव्यातील मडगाव, सालसेत येथील वास्तव्यात त्यांनी धर्मगुरू म्हणून दीर्घकाळ काम पाहिले. त्यांनी लिहिलेल्या "ख्रिस्तपुराणा'ची पहिली आवृत्ती सन 1616 मध्ये प्रकाशित झाली. संत एकनाथकालीन अस्सल मराठमोळ्या भाषेत त्यांनी लिहिलेल्या 11 हजार ओव्या या ग्रंथात आहेत.