आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अहमदनगरात जन्मदात्या पित्याचा मुलाकडून खून

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- दोन गुंठे जागेची वाटणी करुन देण्यास नकार देणार्‍या जन्मदात्या पित्याला सख्ख्या मुलाने बेदम मारहाण केली. ही घटना नगर-दौंड रस्त्यावरील हनुमाननगर येथे सोमवारी (19 ऑगस्ट) घडली. उपचार सुरु असताना या दुर्दैवी पित्याचा मंगळवारी मृत्यू झाला.

मनाजी संतोबा वाळके (वय 80) असे पित्याचे नाव आहे. बाबासाहेब मनाजी वाळके याच्याविरुद्ध कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे. हनुमाननगर येथील दोन गुंठे प्लॉटमध्ये असलेल्या दोन खोल्यांपैकी एका खोलीत मनाजी, तर दुसर्‍या खोलीत त्यांचा मुलगा बाबासाहेब राहत होता. बाबासाहेबला असलेल्या दारुच्या व्यसनामुळे पिता-पुत्रात नेहमीच खटके उडत. दोन गुंठे प्लॉटची वाटणी करुन देण्याची मागणी बाबासाहेबने पित्याकडे केली. मात्र, मनाजीने नकार दिला. याचा राग येऊन बाबासाहेबने लोखंडी पाइपने पित्याच्या डोके, पाठ व पायावर जबर मारहाण केली. त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरु असताना मंगळवारी त्यांचा मृत्यू झाला. जालिंदर मनाजी वाळके यांच्या फिर्यादीवरुन कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.