आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ढिसाळ कारभारामुळेच "फेज टू'योजना बंद !, ठेकेदार संस्थेसह­ "पीएमसी'नेही थांबवले काम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - महापालिकेच्या ढिसाळ कारभारामुळेच शहर सुधारित पाणी योजनेचे (फेज टू) काम बंद पडले. योजनेच्या कामासाठी महापालिकेकडून सुरूवातीपासून सहकार्य मिळाले नाही. आम्ही आमचे काम करण्यास तयार आहोत, परंतु मनपालाच योजनेची काळजी नाही. ठेकेदाराची नऊ कोटींची सहा बिले थकली आहेत, मग ठेकेदार काम कसे करणार, असा उद्विग्न सवाल महाराष्ट्र जीवन प्राधिकरण फेज टूच्या प्रकल्प व्यवस्थापन समितीच्या (पीएमसी) कार्यकारी अभियंत्या सुनंदा नरवडे यांनी गुरूवारी "दिव्य मराठी'शी बोलताना उपस्थित केला.

मनपाचे सहकार्य मिळत नसल्याने तापी प्रिस्टेजने पंधरा दिवसांपासून ११६ कोटींच्या फेज टू योजनेचे काम थांबवले आहे. काम पुन्हा सुरू करावे, यासाठी महापौर संग्राम जगताप यांनी "तापी'च्या व्यवस्थापकीय संचालकांशी चर्चा केली. परंतु जोपर्यंत नऊ कोटींची थकीत बिले मिळत नाहीत, तोपर्यंत काम सुरू करणार नसल्याचे संचालकांनी स्पष्ट केले. असे असतानाही महापौर जगताप मात्र योजनेचे काम सुरूच असल्याचा पोकळ दावा करत आहेत.

योजनेच्या कामासाठी पीएमसी म्हणून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग काम पाहत आहे. "दिव्य मराठी'ने नाशिक येथील पीएमसीच्या कार्यकारी अभियंत्या नरवडे यांच्याशी चर्चा केली. फेज टूचे नाव काढताच त्या म्हणाल्या, आम्ही घर (फेज टू) बांधून देण्यास तयार आहोत, परंतु हे घर कसे बांधायचे, ते मनपाने ठरवायचे आहे. मनपालाच आपलया घराची काळजी नाही, मग आम्ही काय करणार? नरवडे यांनी मनपाच्या कारभारावर ताशेरे ओढले. नऊ कोटींची सहा बिले थकली आहेत, मग ठेकेदार काम तरी कसे करणार? एकतर मनपाने सुरूवातीपासूनच लाइनआऊट दिला नाही. पाण्याच्या टाक्यांपर्यंतची कामे आधी पूर्ण व्हायला हवी होती, परंतु मनपाच्या ढिसाळ नियोजनामुळे दुसऱ्याच कामांना प्राधान्य देण्यात आले. त्यामुळे आडातच नाही, तर पोहऱ्यात कुठून येणार? अशी योजनेची अवस्था झाली आहे. पीएमसी म्हणून काम पाहत असताना आम्हाला थकीत िबलांमुळे अनेक मर्यादा येतात. पीएमसीची २५ लाखांची बिले थकली आहेत. त्याबाबत आयुक्तांशी वारंवार चर्चा केली, परंतु त्यांनी केवळ आश्वासनेच दिली. त्यामुळे आम्हीदेखील योजनेचे काम थांबवले असल्याचे नरवडे यांनी सांिगतले. जोपर्यंत थकीत बिले मिळत नाहीत, तोपर्यंत काम सुरू करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


आधी थकीत बिले द्या
महापालिकेनेया योजनेच्या कामासाठी सुरूवातीपासूनच सहकार्य केलेले नाही. त्यामुळेच योजनेचे काम रखडले. मनपाकडे नऊ कोटींची सहा बिले थकीत आहेत. आधी ही िबले त्यांनी द्यावीत, मग काम सुरू करण्याबाबत विचार करू. अन्यथा मनपाने सरळ दुसऱ्या ठेकेदार कंपनीकडून या पाणी योजनेचे काम करून घ्यावे.''
आय.सी. मेहता, प्रकल्पव्यवस्थापक.

निविदेबाबत अनभिज्ञ
प्रकल्पव्यवस्थापन समितीच्या सर्व्हेनुसार ३५५ िकलोमीटरच्या अंतर्गत जलवाहिन्यांमध्ये २१० िकलोमीटरची वाढ करण्यात आली. त्यामुळे खर्च १५२ कोटींवर गेला. हा खर्च कमी करण्यासाठी डीआयऐवजी एचडीपीई पाइप वापरण्याचा निर्णय महासभेने घेतला. नव्याने २० कोटींची निविदा मंजूर करण्यात आली. परंतु आम्हाला विचारण्यात आले नाही, अशी खंत नरवडे यांनी व्यक्त केली.

महापौरांचा दावा फोल
योजनेचेकाम बंद झाले नसून ते सुरूच असल्याचा दावा महापौर जगताप यांनी केला आहे. मात्र, ठेकेदार संस्थेसह प्रकल्प व्यवस्थापन समितीनेदेखील योजनेचे काम थांबवले आहे. जोपर्यंत थकीत बिले मिळत नाहीत, तोपर्यंत काम सुरू करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. त्यामुळे महापौर जगताप यांचा काम सुरू असल्याचा दावा फोल ठरला आहे.