आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Fear Of Failure Lead Youths Adiction Actor Siddharth Jadhav

अपयशाच्या भीतीने युवक व्यसनाचे बळी - अभिनेता सिद्धार्थ जाधव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नेवासे - मनातील न्यूनगंड अपयशाची भीती यामुळेच सर्वाधिक युवक व्यसनाचे बळी पडत आहेत, अशी माहिती महाराष्ट्र शासनाच्या व्यसनमुक्ती अभियानाचे राजदूत चित्रपट अभिनेता सिद्धार्थ जाधव यांनी केले.

तालुक्यातील देडगाव येथील मनसोडेवाड्यात 'माझे बाबा' या मराठी चित्रपटाच्या चित्रिकरणप्रसंगी पत्रकारांशी जाधव यांनी संवाद साधला. सिध्दार्थ जाधव म्हणाले, अर्थिक भौतिकदृष्ट्या माणूस मोठा होण्यापेक्षा तो माणूस म्हणून आपुलकी निर्माण करणारा म्हणून मोठा झाला पाहिजे. आजची युवा पिढी दारू, गुटखा अमली पदार्थांनी व्यसनाधिन होत आहे. दारुड्या माणसाला कधीच सामाजिक सहानुभूती मिळत नाही. दारूमुळे माणसाचे शरीर खराब होते. दारुडा जिवंत असतानाही समाजाच्या कामाचा नसतो आणि मेल्यानंतरही त्याच्या शरीराचा उपयोग होऊ शकत नाही. कारण त्यावेळी त्याच्या शरीराचा कोणताच अवयव उपयोगी असत नाही. त्यांच्या अकाली मरणाने त्याचे आई-वडील जिवंतपणी मरण अनुभवत असतात. आई-वडिलांना जो दु:खी करतो, त्याचे आयुष्यात कधीच भले होऊ शकत नाही. तरुण पिढीने व्यसनापासून दूर राहून आई-वडिलांना आनंद देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यावेळी चित्रपट दिग्दर्शक सुरेश झाडे, निर्माता सतीश झोंड, कार्यकारी अधिकारी सोहम शिर्के, अंकुश काळे, ज्ञानेश्वर कारखान्याचे संचालक अशोक मिसाळ, कडुभाऊ तांबे, सरपंच रमेश हिवाळे, डॉ. रावसाहेब फुलारी, उपसरपंच दत्ता मुंगसे, लक्ष्मणराव बनसोडे, साहेबराव कदम, चंद्रभान कदम, बन्सीभाऊ एडके आदी उपस्थित आहे.

मराठी चित्रपटांचे भवितव्य उज्ज्वल
सिनेमा बनवणारे ज्या पद्धतीने सिनेमा बनवत आहेत. त्यातच मराठी सिनेमाचे खरे यश आहे. राजा गोसावी, दादा कोंडके, लक्ष्मीकांत बर्डे यांच्यानंतर काही काळ मराठी सिनेमांवर वाईट दिवस आले. पण परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. आज मराठी चित्रपट जागतिक स्तरावरील स्पर्धेत पारितोषिके मिळवत आहेत. परदेशातही मराठी चित्रपट पाहिले जातात. हिंदी-मराठी अशी स्पर्धा राहिलेली नाही. मराठी चित्रपटांचे भवितव्य उज्ज्वल आहे, असे मराठी चित्रपट सृष्टीविषयी जाधव यांनी सांगितले.