आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Festival Meherabadaci Hill Country Today The Devotees Blooming Abroad

उत्सव-मेहेराबादची टेकडी आज देश-विदेशातील भाविकांनी फुलणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर-अवतार मेहेरबाबांच्या 45 व्या अमरतिथी उत्सवास 30 जानेवारीपासून प्रारंभ होत आहे. यानिमित्त समाधीचे दर्शन घेण्यासाठी विविध राज्यांसह 72 देशांतील स्त्री-पुरुष भाविक मेहेराबाद (अरणगाव) येथे दाखल झाले आहेत, अशी माहिती मेहेरबाबा ट्रस्टचे विश्वस्त अँड. मेहेरनाथ कलचुरी यांनी बुधवारी दिली.
नगर शहरापासून सहा किलोमीटर अंतरावर असलेली मेहेराबादची टेकडी भाविकांनी फुलू लागली आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, हॉलंड, स्वीडन, र्जमनी, इराण, चीन, स्पेन, फ्रान्स, मलेशिया, सिंगापूर, न्यूझिलंड, स्विर्त्झंलड आदी देशांतून भाविक आले आहेत. विदर्भाप्रमाणेच आंध्रप्रदेश, उत्तरप्रदेश, हरियाणा, पंजाब, तमिळनाडू, कर्नाटकातून मोठय़ा संख्येने भाविक येतात. सुमारे 20 हजार भाविकांची जेवण व राहण्याची सोय तेथे करण्यात आली आहे. ना नफा, ना तोटा तत्त्वावरील काही उपाहारगृहे उघडण्यात आली आहेत.
30 जानेवारीला दुपारी अडीच वाजता सर्वधर्मीय प्रार्थनेने अमरतिथी उत्सवाला प्रारंभ होईल. 31 जानेवारी हा उत्सवातील महत्त्वाचा दिवस. या दिवशी सकाळी 6 वाजता मेहेरप्रेमी समाधीजवळ जमून प्रार्थना करतील. नंतर लोअर मेहेराबाद येथील धुनी पेटवून मेहेरधून म्हणतील. दुपारी 12 ते 12.15 या वेळात मेहेरभक्त महामौन पाळतील. मौनाअगोदर मेहेरबाबांना आवडणारी ‘द बिगीन द बिगीन’ ही धून वाजवली जाईल. नंतर विविध भाषांमधून प्रार्थना, आरती करण्यात येईल. भजन, गझला, कव्वाली यांचे कार्यक्रम होतील. नृत्य सादर होईल. मेहेरबाबांवर आधारित फिल्म दाखवण्यात येईल. विदेशी भाविक कार्यक्रम सादर करतील. 1 फेब्रुवारीला उत्सवाची सांगता होईल, असे कलचुरी यांनी सांगितले. अमरतिथीचे सर्व कार्यक्रम इंटरनेटवर प्रसारित करण्यात येणार आहेत. त्यामुळे जगभरातील मेहेरप्रेमींना ते बघता येतील.
24 सप्टेंबर 1954
आज जेथे समाधीस्थळ आहे, त्या खोलीत अवतार मेहेरबाबा साधना करत. हे दुर्मिळ छायाचित्र आहे 24 सप्टेंबर 1954 रोजी घेतलेले. भेटण्यासाठी आलेल्या काही पाश्चिमात्त्य मेहेरप्रेमीसमवेत मेहेरबाबा छायाचित्रात दिसतात. याच वास्तूत आता बाबांची समाधी आहे. उजवीकडील छायाचित्र सध्याचे आहे.
‘सेवेत प्रभुत्व’ शिकवणुकीचे आचरण
मेहेराबादला येणारे भाविक स्वयंस्फूर्तीने सर्व कामे करतात. काहीजण फरशी पुसण्याचे, काहीजण साफसफाईचे, तर काहीजण शौचालय धुण्याचे काम करतात. ‘सेवेतच प्रभुत्व सामावले आहे’, असे अवतार मेहेरबाबा सांगत. त्याची प्रचिती येथे येते.
मला येथेच समाधिस्त करा..
अवतार मेहेरबाबांचे महानिर्वाण 31 जानेवारी 1969 रोजी मेहेराझाद येथे झाले. 7 फेब्रुवारीला त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. माझा मृत्यू जगात कोठेही झाला, तरी अंत्यविधी मेहेराबाद येथेच करण्यात यावा, असे मेहेरबाबांनी सांगितले होते.