आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरमध्ये दोन गट भिडले, दोन्ही बाजुंनी सोडा वाॅटरच्या बाटल्या हल्ला; शहरात तणाव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदनगर- शहराच्या तेलीखुंट भागात शुक्रवारी रात्री १० च्या सुमारास दंगल उसळली. दोन गट परस्परांवर चालून गेले. दोन्ही बाजुंनी सोडा वाॅटरच्या बाटल्या फेकण्यात आल्या. त्यामुळे परिसरात काचांचा खच पडला होता. प्राथमिक माहितीनुसार या दंगलीत अनेक जण जखमी झाले असून शहरात सर्वत्र पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

दरम्यान, रात्री उशिरापर्यंत शहरातील अनेक भागांत वीजपुरवठा खंडित होता. मोबाइल दुरध्वनी सेवाही काही वेळ विस्कळीत होती. या दंगलीमागचे कारण समजू शकलेले नाही. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. 
बातम्या आणखी आहेत...