आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘माध्यमिक शिक्षक’च्या सभेत यंदाही गोंधळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या रविवारी सहकार सभागृहात झालेल्या सभेत 2014-2015 च्या 47 कोटींच्या अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यात आली. काही मुद्द्यांवर विरोधकांनी प्रश्न उपस्थित केल्याने सभेत गोंधळ झाला.
अध्यक्ष विष्णू शेकडे यांनी ताळेबंद मांडून 14 टक्के लाभांश देण्यात येणार असल्याचे सांगितले. सुभाष कडलग यांनी लेखापरीक्षणाचा मुद्दा उपस्थित केला. लेखापरीक्षणासाठी 33 लाख रुपये खर्च येत असल्याचे सांगताच संचालक भाऊसाहेब कचरे म्हणाले, सोसायटीच्या ठेवी आणि कर्जवाटपात वाढ झाली आहे. 97 व्या घटनादुरुस्तीनुसार पाच लाखांवर 25 पैसे शेकडा लेखापरीक्षणाचा खर्च येतो. सोसायटीचा कारभार ताब्यात आला, तेव्हा 26 कोटींचे कर्जवाटप व 2 लाख लेखापरीक्षण शुल्क होते. आता कर्जवाटप 431 कोटींवर पोहोचले आहे. लेखापरीक्षक नियुक्तीचा अधिकार सर्वसाधारण सभेला असल्याने लेखापरीक्षकाची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव कडलग यांनी मांडला. भरत कानवडे या सभासदाने कडलग यांना किती मासिक बैठकीत हा प्रश्न उपस्थित केला असा सवाल केला. त्यावरून सभागृहात गोंधळ झाला. काही सभासदांनी गोंधळाचा फायदा उठवत बाजारातून आणलेल्या शिट्या वाजवण्याची संधी सोडली नाही. कानवडे यांनी व्यासपीठावर जाऊन प्रश्न विचारावा अशी भूमिका काहींनी घेतली. त्यानंतर सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली.