आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संगमनेरच्या प्रियंका नागरेचे ‘वाक्या’तून चित्रसृष्टीत पदार्पण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आश्वी- संगमनेर तालुक्यातील किशोर कदम, अजिंक्य रहाणे श्रध्दा घुले यांच्यापाठोपाठ मालुंजे गावातील शेतकरी ज्ञानदेव पाराजी नागरे लक्ष्मी यांच्या कुटुंबात जन्माला आलेली प्रियंका नागरे हिने “वाक्या” या मराठी चित्रपटातून रूपेरी पडद्यावर पदार्पण केले. शुक्रवारी हा चित्रपट सर्वत्र झळकला. प्रियंकाने व्यावसायिक रंगभूमीवर ४०० हून अधिक प्रयोग केले आहेत. 

वाक्या हा चित्रपट समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असलेला आणि आर्थिकदृष्ट्या वंचित पोतराज या भटक्या जमातीचे दर्शन घडवतो. शिक्षणापासून एकही मूल वंचित राहू नये, यासाठी शासनाचा शिक्षण हक्क कायदा अस्तित्वात असतानाही पोतराजच्या मुलांना शिक्षणाचा लाभ घेता येत नाही. कारण ही उपेक्षित, वंचित भटकी जमात कुटुंबासह गावोगावी अंगावर आभरान चढवून बायकोच्या डोक्यावर मरीआईचा गाडा, गळ्यात हलगी, मदान, अंगावर आसुडाचे फटके ओढून घेत पायातील वाक्या वाजवत गावोगावी भटकंती करत उपजीविका करते. या परंपरेवर पाऊल ठेवत त्यांची मुलेदेखील पुढे पोतराज होतात. 

हालअपेष्टा सहन करत असताना पोतराज एकूणच भटक्या विमुक्त जमातींची समाजाकडून होणारी उपेक्षा, त्यांच्यावर होणारे अन्याय या स्थितीचा सामना करीत न्यायासाठी झगडणाऱ्या समोर उभी राहणारी संकटं त्यातून पोतराजाच्या दोन पिढ्यांत निर्माण होणारा संघर्ष यावर चित्रपटाची आधारित आहे. पोतराज ही लोककला मानली जात असली, तरी ती एक परंपरा आहे. त्यामुळे या समाजात जगणाऱ्या माणसांना काही मर्यादा येत असतात. याचं अनिष्ठ प्रथेत “वाक्यां” पोतराजही अडकला असल्याने. या परंपरा तोडण्याचे बळ हा चित्रपट देतो, असे प्रियंकाने सांगितले. 

प्रियंकाने आडनावात बदल करत आई वडील यांचे नाव एकत्रित करुन “ज्ञानलक्ष्मी” असे केले आहे. प्रियंकाला अनेक स्पर्धांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री लक्षवेधी अभिनेत्री पुरस्कार मिळाले आहेत. पटकथा संवाद लेखनही तिने केले आहे. 

संगमनेरचे आमदार बाळासाहेब थोरात डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, राजहंस दूध संघाचे रणजितसिंह देशमुख शरयुताई देशमुख आदींनी या चित्रपटाला शुभेच्छा दिल्या आहेत. 
 
अभिनयाबरोबर लेखनही... 
याचित्रपटात लेखिका अभिनेत्री या दुहेरी भूमिकेतून प्रियंका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. प्रियंकाने पोतराजची पत्नी सुशीची भूमिका केली असून पोतराजच्या भूमिकेत अभिजित कुलकर्णी, किशोरी शहाणे, गणेश यादव, प्रेमा किरण मुलाच्या भूमिकेत पंशूल कमोद हे कलाकार आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शक राजदत्त आहेत. गाणी बिपीन, संगीत देव आशिष गायक आदर्श शिंदे यांनी गायली आहेत. संगमनेर तालुक्यातील मालुंजे, ओझर डिग्रस येथे चित्रीकरण सुरु असताना स्थानिक कलाकारांना चित्रपटात भूमिका करण्याची संधी मिळाली. 
बातम्या आणखी आहेत...