आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भायगाव येथील लघुपटाची महोत्सवासाठी निवड, ‘रानफुल’चे प्रदर्शन नेपाळमधील धारण गावात होणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुग्धा घेवरीकरची भूमिका असलेल्या रानफूल लघुपटाचे पोस्टर. - Divya Marathi
मुग्धा घेवरीकरची भूमिका असलेल्या रानफूल लघुपटाचे पोस्टर.
नगर - शेवगाव तालुक्यातील भायगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत चित्रीकरण झालेल्या ‘रानफूल’ या लघुपटाची पहिल्या नेपाळ इंटरनशनल शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलसाठी निवड झाली. या चित्रपटाच्या प्रदर्शनाकडे तेथील विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.
या लघुपटाची कथा अॅड. चेतन गांधी यांची असून पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन रिमा सदाशिव अमरापूरकर यांनी केले आहे. अकरा ते चौदा जानेवारीदरम्यान हा महोत्सव नेपाळमधील धारण येथे होणार अाहे. या महोत्सवासाठी जगभरातील दर्जेदार लघुपट मागवण्यात आले होते. त्यातून ‘रानफूल’ची निवड करण्यात आली.

अजूनही सरकारी, तसेच पालिकांच्या शाळांमधील मुलांना मानवी हक्क मिळत नाहीत. अनेक सुविधांपासून ते वंचित असतात. पिण्याची पाण्याची समस्या ग्रामीण भागातील मुलांच्या जीवावर कशी बेतू शकते, हे सरिता या मुलीच्या माध्यमातून या लघुपटात दाखवण्यात आले अाहे. पाण्यासारख्या मूलभूत गरजांचा त्यांच्या भावविश्वावर आणि शिक्षणावर होणारा विपरीत परिणाम हा लघुपट अधोरेखित करतो.

या लघुपटासाठी शेवगाव परिसरातील बाल कलावंतांची निवड करण्यात आली होती. सरिताची मुख्य भूमिका मुग्धा घेवरीकर हिने साकारली असून मधुरा म्हस्के, माउली पाटील या बाल कलाकारांसह भायगावच्या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक सुखदेव शिंदे यांनी या लघुपटात भूमिका केली आहे. मुग्धाने याआधीही अनेक लघुपटात कामे केली असून विविध पुरस्कारांनी तिला गौरवण्यात आले आहे. दिग्दर्शक रिमा यांनीही याआधी अनेक लघुपट तयार केले आहेत.
भायगाव परिसरात चित्रीकरण झालेल्या स्थानिक बाल कलाकारांच्या भूमिका असलेल्या या लघुपटाची आंतरराष्ट्रीय महोत्सवासाठी निवड झाल्याने शेवगाव भायगाव परिसरात मोठी उत्सुकता आहे
बातम्या आणखी आहेत...