आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चित्रपटांच्या निर्मितीसाठी नगरमध्ये योग्य वातावरण, "प्रतिबिंब'च्या उद्घाटनप्रसंगी खानदेशे यांचे मत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- चित्रपटनिर्मितीसाठी नगरमध्ये अनुकूल प्रयोग होत अाहेत. पुणे, मुंबई व कोल्हापूरनंतर नगरमध्ये चित्रपटांसाठी अनुकूल वातावरण निर्माण होत आहे, असे मत जिल्हा मराठा विद्या प्रसारकचे जी. डी. खानदेशे यांनी व्यक्त केले.
चित्रमहर्षी दादासाहेब फाळके यांच्या स्मृतिदिनानिमित्त न्यू आर्टस् कॉलेजमधील संज्ञापन अभ्यास विभागातर्फे आयोजित ‘प्रतिबिंब’ या आठव्या चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष माधवराव मुळे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.खानदेशे म्हणाले, संज्ञापन अभ्यास विभागाचे विद्यार्थी नगरचे नाव चित्रपट निर्मितीच्या रूपाने देश-विदेशांत पोहोचवत आहेत, ही अभिमानास्पद गोष्ट आहे. मुळे म्हणाले, मुंबई, पुणे, कोल्हापूर ही शहरे चित्रपटसृष्टीत पुढे आहेत. आपण नगरकर का मागे आहोत? ही उणीव भरून काढण्यासाठी विद्यालय व महाविद्यालय पातळीपासून नाटकांचे प्रयोग झाले पाहिजेत.प्राचार्य डॉ. बी. एच. झावरे म्हणाले, माध्यमांकडे फक्त मनोरंजन म्हणून पाहू नये. समाज प्रबोधन व कलात्मक संस्कृती रुजवण्यासाठी चित्रपट महत्त्वाची भूमिका बजावतात.
प्रास्ताविक प्रा. बापू चंदनशिवे यांनी केले. या वेळी संस्थेच्या सहसचिव दीपलक्ष्मी म्हसे, सदस्य अरुणा काळे, डॉ. एस. एस. जाधव उपस्थित होते. माजी विद्यार्थी व रुपया, वटअमावास्या या लघुपटाचे दिग्दर्शक महेश काळे तसेच "ख्वाडा' चित्रपटाचे कार्यकारी निर्माते मंगेश जोंधळे यांचा सत्कार करण्यात आला. आभार प्रा. राहुल चौधरी यांनी मानले, तर सूत्रसंचालन प्रा. श्वेता बंगाळ यांनी केले. या महोत्सवात दाखवण्यात आलेल्या चित्रपट व लघुपटांना रसिक प्रेक्षकांकडून उदंड प्रतिसाद लाभला.