आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात डेंग्यूचे सात रुग्ण, अधिकाऱ्यांसह नगरसेवक महापौरांचे दुर्लक्ष

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदनगर- शहरात डेंग्यूची लागण होऊन तब्बल महिना उलटला, परंतु मनपा अधिकारी पदाधिकारी अद्याप जागचे हललेदेखील नाहीत. धूर औषध फवारणी सुरू असल्याचा कांगावा मनपा प्रशासन करत आहे. परंतु या तोकड्या उपाययोजनांद्वारे डेंग्यू रोखणे कठीण आहे. आठ-दहा महिन्यांपूर्वी आगरकर मळा परिसरात हजारो नागरिकांना काविळीची लागण झाली होती. तेव्हादेखील मनपा प्रशासन उशिरा जागे झाले होते. आता डेंग्यूबाबतही तसेच घडत आहे. मनपाच्या एकाही अधिकारी पदाधिकाऱ्याला डेंग्यूच्या गंभीर प्रश्नाचे देणे-घेणे नाही. महापौर अभिषेक कळमकर सत्कार समारंभात मग्न आहेत. त्यामुळे त्यांना अारोग्य विभागाची बैठक घेण्यासही वेळ नाही. शहरातील आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मनपाचा आरोग्य विभाग जिल्हा हिवताप विभागामार्फत डेंग्यूसदृश रुग्णांचे रक्ताचे नमुने घेऊन ते शासकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येतात. शहरासह जिल्ह्यातील १३८ डेंग्यूसदृश रुग्णांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले. त्यात शहरात सात रुग्णांना डेंग्यू झाल्याचे स्पष्ट झाले. ज्या भागात हे रुग्ण आढळून आले, त्या भागात प्राधान्याने धूर फवारणी कीटकनाशक फवारणी करण्यात येत असल्याचा दावा मनपा प्रशासन करत आहे. मात्र, रुग्णांची वाढती संख्या पाहता त्यांचा हा दावा फोल असल्याचे स्पष्ट होते.

शहरातडेंग्यूच्या रुग्णांत मोठी वाढ झाली आहे. सरकारी आकडेवारीनुसार शहरात डेंग्यूचे सात रुग्ण आहेत, तर ५० पेक्षा अधिक डेंग्यूसदृश रुग्ण आहेत. सरकारी "एलायझा' चाचणीतून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. खासगी रूग्णालयांतील "रॅपिड एनएस वन' चाचणीनुसार मात्र डेंग्यूच्या रुग्णांची संख्या निश्चितच जास्त आहे. रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना मनपा अधिकारी पदाधिकारी बघ्याची भूमिका घेत आहेत. डेंग्यू रोखण्यासाठी मनपाने अद्याप कोणत्याच ठोस उपाययोजना केल्याने रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होण्याची भीती आहे.
केडगाव, बुरूडगाव रोड, तसेच स्टेशन रोड परिसरातील सातजणांना डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. दोन आठवड्यांपूर्वी स्टेशन रोड परिसरात आठ महिन्यांच्या मुलीचा डेंग्यूने बळी घेतला. सरकारी यंत्रणेने मात्र या चिमुकलीचा बळी डेंग्यूने झाला नसल्याचे स्पष्ट केले. खासगी रुग्णालयातील रॅपिड चाचणीनुसार या चिमुकलीचा डेंग्यूमुळेच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. शहरात ५० पेक्षा अधिक डेंग्यू सदृश रुग्ण आहेत. त्यामुळे रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

शहरात डेंग्यूची लागण होऊन तब्बल महिना उलटला, परंतु मनपा अधिकारी पदाधिकारी अद्याप जागचे हललेदेखील नाहीत. धूर औषध फवारणी सुरू असल्याचा कांगावा मनपा प्रशासन करत आहे. परंतु या तोकड्या उपाययोजनांद्वारे डेंग्यू रोखणे कठीण आहे. आठ-दहा महिन्यांपूर्वी आगरकर मळा परिसरात हजारो नागरिकांना काविळीची लागण झाली होती. तेव्हादेखील मनपा प्रशासन उशिरा जागे झाले होते. आता डेंग्यूबाबतही तसेच घडत आहे. मनपाच्या एकाही अधिकारी पदाधिकाऱ्याला डेंग्यूच्या गंभीर प्रश्नाचे देणे-घेणे नाही. महापौर अभिषेक कळमकर सत्कार समारंभात मग्न आहेत. त्यामुळे त्यांना अारोग्य विभागाची बैठक घेण्यासही वेळ नाही. शहरातील आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मनपाचा आरोग्य विभाग जिल्हा हिवताप विभागामार्फत डेंग्यूसदृश रुग्णांचे रक्ताचे नमुने घेऊन ते शासकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येतात. शहरासह जिल्ह्यातील १३८ डेंग्यूसदृश रुग्णांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले. त्यात शहरात सात रुग्णांना डेंग्यू झाल्याचे स्पष्ट झाले. ज्या भागात हे रुग्ण आढळून आले, त्या भागात प्राधान्याने धूर फवारणी कीटकनाशक फवारणी करण्यात येत असल्याचा दावा मनपा प्रशासन करत आहे. मात्र, रुग्णांची वाढती संख्या पाहता त्यांचा हा दावा फोल असल्याचे स्पष्ट होते.
सरकारी खासगी चाचण्यांचा गोंधळ
शहरातडेंग्यूसदृश रुग्णांची संख्या जास्त आहे. मात्र, या रुग्णांचा सरकारी खासगी चाचण्यांमुळे मोठा गोंधळ उडाला आहे. सरकारी यंत्रणेकडून एलायझा चाचणीचा अहवाल ग्राह्य धरण्यात येतो, तर खासगी रुग्णालये रॅपिड चाचणीचा अहवाल ग्राह्य धरतात. खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या डेंग्यूसदृश रुग्णांची संख्या जास्त आहे. खासगी रुग्णालयातील रॅपिड चाचणीनुसार त्यांना डेंग्यू झाला असला, तरी सरकारी यंत्रणा मात्र या चाचणीचा अहवाल मान्य करण्यास तयार नाही. त्यामुळे रुग्णांचा गोंधळ उडाला आहे.

उपाययोजना सुरू
ज्याभागात डेंग्यूसदृश रुग्ण आढळून आले, त्या भागात प्राधान्याने धूर औषध फवारणी करण्याचे काम सुरू आहे. नागरिकांनी स्वत:चे घर परिसरात पाणी साचणार नाही, याची काळजी घ्यावी. अाठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळणे आवश्यक आहे. आमच्या उपाययोजना सुरू आहेत. तथापि, नागरिकांनीदेखील काळजी घेणे आवश्यक आहे.'' सतीशराजूरकर, आरोग्याधिकारी,मनपा.

अशी घ्या काळजी
-एडीस नावाचा डास चावल्याने होतो डेंग्यू
- एडीस डास दिवसा चावतो
- स्वच्छ साठलेल्या पाण्यात आढळतो एडीस
- घर परिसर नेहमी स्वच्छ ठेवा
- आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळा
- पाण्याचे साठे पूर्णपणे कोरडे करा
- निरुपयोगी वस्तू घर परिसरात ठेवू नका
- खिडक्यांना जाळ्या बसवा
- मच्छरदाणी डास प्रतिबंधक औषधे वापरा