आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पोलिस अधीक्षक शिंदे यांना रु. 10 हजार भरण्याचे आदेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - स्मिता दीपक घोडके या शिक्षिकेच्या संशयास्पद मृत्यूसंदर्भात दाखल असलेल्या याचिकेच्या सुनावणीला वारंवार अनुपस्थित राहिले, म्हणून पोलिस अधीक्षक रावसाहेब शिंदे यांना 10 हजार रुपये भरण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. खंडपीठाचे न्यायमूर्ती पी. आर. बोरा व एस. एस. शिंदे यांच्या खंडपीठाने 23 जूनला हा आदेश दिला आहे.
2013 मध्ये स्मिता घोडके या बेपत्ता असलेल्या शिक्षिकेचा मृतदेह वंजारगल्ली परिसरात आढळून आला होता. कोतवाली पोलिसांनी याप्रकरणी आत्महत्येचा गुन्हा नोंदवला.

स्मिताने आत्महत्या केली नसून तिचा खून झाला आहे, त्यामुळे पोलिसांनी याप्रकरणी सखोल तपास करावा, म्हणून उज्ज्वला मधुकमल हिवाळे यांच्यातर्फे अ‍ॅड. काकासाहेब तांदळे यांनी 2013 मध्ये औरंगाबाद खंडपीठात एक क्रिमिनल याचिका दाखल केली होती.
यावरील सुनावणीत खंडपीठाने पोलिस अधीक्षकांना स्मिता घोडके प्रकरणाचा तपास करून चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. मात्र, चार महिने उलटूनही चौकशी अहवाल सादर झाला नाही. तसेच शिंदे याचिकेवरील सुनावणीला वारंवार अनुपस्थित राहिले. या संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा तपासही ठप्प होता. त्यामुळे खंडपीठाने पोलिस अधीक्षक शिंदे यांना 10 हजार रुपये भरण्याचे आदेश दिले आहेत. ही रक्कम पोलिस अधीक्षकांनी सरकारी खर्चातून न भरता स्वत:च्या वैयक्तिक उत्पन्नामधून भरावी, असेही खंडपीठाने स्पष्ट केले आहे.