आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दंड लाखांचा, पण शिस्तीचे काय ?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - हनुमान जयंतीच्या मुहूर्तावर सुरु केलेल्या नाकाबंदी मोहिमेअंतर्गत शहरात वाहन तपासणीची कारवाई सातत्याने सुरु आहे. सोमवारी सकाळी १० ते १२ सायंकाळी ते या वेळेत शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करुन वाहन तपासणी करण्यात आली. तीन दिवसांपासून सुरु असलेल्या या कारवाईत मोटार वाहन कायद्यान्वये सुमारे दोन हजारांहून अधिक वाहनांवर केसेस करण्यात आल्या. दोन लाख रुपयांहून अधिक दंड वसूल झाला. पण या मोहिमेमुळे वाहनचालकांना शिस्त लागेल का? असा प्रश्न विचारला जात अाहे.

शहरातील चेन स्नॅचिंग, अपहरणांचे प्रकार, अॅपेरिक्षा चालकांची अरेरावी, तसेच जातीय तणावाचे प्रकार रोखण्यासाठी पोलिस अधीक्षकांनी शहरात सकाळी सायंकाळी नाकाबंदी मोहीम सुरु केली आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक लखमी गौतम, अतिरिक्त अधीक्षक शैलेश बलकवडे, शहर विभागाचे पोलिस उपअधीक्षक यादवराव पाटील, परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक प्रांजल सोनवणे, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक शशिराज पाटोळे, कोतवाली तोफखान्याचे पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर ढोकले लक्ष्मण काळे, शहर वाहतूक शाखा असा मोठा फौजफाटा या कारवाईत सहभागी आहे.

या मोहिमेअंतर्गत दुचाकी चारचाकी वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. वाहन चालवण्याचा परवाना, वाहनाची कागदपत्रे, ट्रिपल सीट, तसेच वाहनांच्या नंबर प्लेट तपासण्यात येत आहेत. नियमानुसार चालत नसलेल्या वाहनचालकांना दंडात्मक कारवाईला सामारे जावे लागत आहे. शनिवारी चौपाटी कारंजा, सर्जेपुरा, दिल्ली दरवाजा, पत्रकार चौक, आयुर्वेद चौक, प्रेमदान चौक, पोलिस अधीक्षक चौक आदी ठिकाणी नाकाबंदी करुन दुचाकी चारचाकी वाहनांची तपासणी करण्यात आली. शनिवारी दिवसभरात तब्बत ८०० हून अधिक वाहनांवर केसेस करण्यात आल्या.

रविवारी सायंकाळी, तसेच सोमवारी सकाळी सायंकाळी शहरातील ठरावीक ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली. तीन दिवसांत मिळून लाखांहून अधिक दंड वसूल करण्यात आला. शहरातील वाहनचालकांना शिस्त लागावी, असा या मोहिमेचा उद्देश असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. परंतु नाकाबंदी करत असताना वाहनचालक पोलिसांमध्ये खटकेही उडत आहेत. दरम्यान, तीन दिवसांपासून सुरु असलेल्या नाकाबंदीच्या कारवाईमुळे वाहनांवर झालेल्या केसेसचा उच्चांक झाला आहे. पण या मोहिमेमुळे सामान्य नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असल्याच्या प्रतिक्रिया आहेत.

चालकांची स्टंटबाजी
एखाद्यावाहनचालकाकडे आवश्यक कागदपत्रे नसल्यास ते पोलिसांपासून बचावासाठी नाना प्रयत्न करतात. राजकीय नेत्यांना सुटकेसाठी साकडे घातले जाते. काही जण समोर पोलिस दिसले, की अचानक यु टर्न घेतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊन किरकोळ अपघात बाचाबाचीचे प्रकारही घडत आहेत. आवश्यक कागदपत्रे बाळगली, तर हे दिव्य करण्याची वेळ येणार नाही.

शिस्त लावण्यासाठीच नाकाबंदी मोहीम
नगरकरांनावाहन चालवण्याची शिस्त लागावी, गंभीर गुन्हे होऊ नयेत, यासाठी खबरदारी म्हणून शहरात नाकाबंदी मोहीम सुरु करण्यात आली आहे. नियम मोडणाऱ्या चालकांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावेच लागेल. या मोहिमेत मी स्वत: लक्ष घातले आहे. नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळून पोलिसांना सहकार्य करावे, अशी अपेक्षा आहे.'' लखमीगौतम, जिल्हा पोलिस अधीक्षक.

संमिश्र प्रतिक्रिया
पोलिसांच्यामोहिमेचे सामान्य नगरकरांनी कौतुक केले. काहींनी मात्र कारवाईवर आक्षेप घेतले आहेत. पोलिसांनी मोहिमेत सातत्य ठेवले, तर नगरकरांना वाहतुकीची शिस्त लागेल, असे काही जण म्हणतात. पोलिस कागदपत्रांची तपासणी करताना अपमानास्पद वागणूक देतात, वाहनाची चावी काढून मनस्ताप देतात, अशा तक्रारीही ऐकायला मिळत आहेत.