आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भ्रष्टाचार संपवल्यावरच ओबामा यांची भेट घेईन - अण्णा हजारे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - देशातील भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन झाल्याशिवाय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना मी भेटणार नाही. त्यांच्याबरोबर फोटो काढून घेण्यात मला स्वारस्य नाही, असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी बुधवारी स्पष्ट केले. पर्यावरण दिनानिमित्त कार्यक्रमासाठी अण्णा आले होते.

ते म्हणाले, ओबामा यांचे सल्लागार प्रकाश शाह काही दिवसांपूर्वी मला भेटले होते. त्यांच्याशी मी चर्चा केली. ‘माझे गाव माझे तीर्थ’ या पुस्तकाने ओबामा प्रभावित झाले आहेत. भ्रष्टाचारविरोधी आंदोलनावर ओबामांना माझ्याशी बोलायचे आहे, असे शाह यांनी सांगितले. परंतु भ्रष्टाचार संपवण्याचे उद्दिष्ट साध्य झाल्याशिवाय ओबामांना भेटणार नाही. रामदेवबाबा, अरविंद केजरीवाल, श्रीश्री रविशंकर यासारख्यांनी एकत्र येऊन भ्रष्टाचार संपवला पाहिजे.