आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोगस डॉक्टरवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - महाराष्ट्र काैन्सिल ऑफ इंडियन मेडिसीनने जिल्ह्यातील तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांची प्रमाणपत्रे नोंदणीकृत नसल्याचे स्पष्ट केले. संबंधित बोगस डॉक्टरांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पी. डी. गांडाळ यांनी दिली.

नोंदणीकृत नसताना काहीजण बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे वैद्यकीय व्यवसाय करत असल्याच्या तक्रारी जिल्हा प्रशासन, तसेच तालुकास्तरावर आल्या आहेत. बोगस डॉक्टरांचा शोध लावण्यासाठी जिल्हास्तर, तालुका, तसेच नगरपालिका, महापालिकास्तरावर समित्या आहेत. बोगस वैद्यकीय व्यावसायिकांना चाप लावण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचेही शासनाचे निर्देश आहेत. जिल्हास्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती आहे. या समितीतील सदस्य वैद्यकीय महाविद्यालयाचा अधिष्ठाता, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी, साहाय्यक आयुक्त अन्न आैषध प्रशासन, सदस्य सचिव उपजिल्हा पोलिस अधीक्षक आहेत. तालुकास्तरावरही समित्या आहेत. नागरिकांच्या तक्रारींची शहानिशा करताना वैद्यकीय व्यवसायाचे नोंदणीकृत प्रमाणपत्रही तपासले जाते.

डाॅ. गांडाळ म्हणाले, शेवगाव तालुक्यातील दहीगावने येथील अर्जुन मुजुमदार, संगमनेर तालुक्यातील कोकणगाव येथील ठकाजी भागवत, श्रीगोंदे तालुक्यातील मांडवगण येथील एन. तालुकादार या व्यावसायिकांची प्रमाणपत्रे तपासणीसाठी महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसीनकडे पाठवण्यात आली होती. नुकताच या प्रमाणपत्राचा अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त झाला.

आणखी २३ जणांचा पत्ता लागेना
नगर जिल्ह्यात २६ बोगस वैद्यकीय व्यावसायिक असल्याच्या तक्रारी आरोग्य विभागाकडे करण्यात आल्या होत्या. त्यापैकी जणांचे प्रमाणपत्र नोंदणीकृत नसल्याचे सिद्ध झाले. उर्वरित २३ जणांचा शोध आरोग्य विभागाला लागलेला नाही. त्यामुळे जिल्हाभर बोगस वैद्यकीय अधिकाऱ्यांची शोध मोहीम हाती घेतली जाणार असल्याचेही आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
बातम्या आणखी आहेत...