आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महिंद्रा कंपनीच्या मालकासह तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - नवी स्कॉर्पिओ असल्याचे सांगून जुनीच गाडी विकल्याप्रकरणी महिंद्रा कंपनीचे मालक आनंद महिंद्रा यांच्यासह तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला. हा प्रकार विजयादशमीला सबलोक शोरुममध्ये घडला. ग्राहक न्यायालयाने दिलेल्या आदेशावरून महिंद्राचे मालक आनंद महिंद्रा (मुंबई) यांच्याविरुद्धही गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

आरोपींमध्ये शोरुमचे मालक कमल पृथ्वीचंद सबलोक (सर्जेपुरा) व सेल्स मॅनेजर बाबासाहेब बहिरू दारकुंडे (केडगाव) यांचाही समावेश आहे. गाडी खरेदी करणारे सोनल सुभाष निकम (२७, वडगाव गुप्ता) यांनी ही फिर्याद दिली आहे. त्यांना स्कॉर्पिओ एस ८ खरेदी करायची होती. ९ ऑक्टोबरला ते नागापूर परिसरातील सबलोक कार्स शोरुममध्ये गेले. सेल्स मॅनेजर दारकुंडे यांनी त्यांना कोटेशन दिले. निकम यांना ही गाडी विजयादशमीला घ्यायची होती. शोरुमचे मालक सबलोक यांच्याशी त्यांनी तशी चर्चा केली.

निकम यांनी १० ऑक्टोबरला तीन लाख व २४ ऑक्टोबरला १ लाख ९३ हजार ७९२ रुपये रोख स्वरूपात शोरुममध्ये भरले. त्याच्या पावत्याही त्यांना देण्यात आल्या. विम्याची रक्कम भरल्याची ३८ हजार ६०० रुपयांची पावती व हस्तांतरण पावतीही त्यांना देण्यात आली. उर्वरित रकमेसाठी त्यांनी महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्सचे कर्जप्रकरण केले. गाडी मिळाल्यानंतर दोन दिवसांनी ब्रेक व्यवस्थित काम करत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी वाहन शोरुममध्ये आणले. तेथील संगणकीय प्रणालीत या वाहनाचा चेसी नंबर पारनेरच्या एका व्यक्तीच्या नावावर असल्याचे लक्षात आले. याबाबत सेल्स मॅनेजर व शोरुम मालकाशी चर्चा केली असता त्यांनी निकम यांना अरेरावीची भाषा वापरत खंडणीच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली. त्यामुळे निकम यांनी न्यायालयात खासगी फिर्याद दाखल केली हाेती. त्यावर दाेन्ही बाजूंचे म्हणणे एेकल्यानंतर कंपनी मालकासह तिघांवर गुन्हा दाखल करण्याचे अादेश न्यायालयाचे दिले अाहेत.
बातम्या आणखी आहेत...