आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नेवासे फाटा येथील असनानी हॉटेलला शॉर्टसर्किटमुळे आग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- नेवासे तालुक्यात विजेच्या शॉर्टसर्किटने रविवारी दोन ठिकाणी आगी लागून साडेसात लाख रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

पहाटे साडेचार वाजता नेवासे फाटा येथील असनानी हॉटेलमध्ये शॉर्टसर्किटने होऊन आग लागून 6 लाख 20 हजार रुपयांचे नुकसान झाले. मालक श्यामलाल आसनानी यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये दोन लाख पन्नास हजार रुपयांचे काउंटर, एक लाख रुपयांचे वायर फिटिंग, दीड लाख रुपयांची वाइन, 77 हजार रुपयांचे फ्रीज व 34 हजार रुपये रोख रक्कम जळून खाक झाल्याचे नमूद करण्यात आले. टँकरने पाणी आणून आग आटोक्यात आणली गेली. तपास पोलिस निरीक्षक मुकुंद आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक पी. व्ही. राठोड करत आहेत. दुसर्‍या घटनेत उस्थाळ दुमाला येथील पंडित पिटेकर यांच्या घराला दुपारी आग लागली. आगीत घर जळून खाक झाले. संसारोपयोगी साहित्य, तीन तोळ्यांचे सोन्याचे दागिने, रोख पाच हजार रुपये, टीव्ही, कपाट, तीन पोते बाजरी आदी आगीत जळाले.