आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिर्डी संस्थानच्या रुग्णालयात आग; दीड कोटींची यंत्रे खाक, सुदैवाने जीवित हानी नाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिर्डी - शिर्डी येथील साईबाबा संस्थानच्या साईबाबा सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलच्या ऑपरेशन थिएटरला शुक्रवारी शॉर्टसर्किटमुळे मोठी आग लागली. या आगीत जीवितहानी झाली नसली तरी अंदाजे दीड कोटीची उपकरणे आगीत जळून खाक झाली.

या रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरला शॉर्टसर्किटमुळे पहाटे आग लागली. आग लागल्याचे समजतात सुरक्षा रक्षकांनी याबाबत अग्निशमन दलाला माहिती दिली. जवानांनी ताबडतोब कार्बन डायॉक्साइड पंपचा वापर करून आग आटोक्यात आणली. शिर्डीचे तलाठी अनिल मांढरे व पोलिस उपनिरीक्षक संदीप कहांळे यांनी या घटनेचा पंचनामा केला आहे. याबाबत संस्थानचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र जाधव यांनी सांगितले की, येत्या सात दिवसांत हे ऑपरेशन थिएटर पुन्हा कार्यान्वित करण्यात येणार आहे. रुग्णालयात तीन ऑपरेशन थिएटर असल्यामुळे रुग्णसेवेवर कोणताही परिणाम होऊ देणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, साईबाबा सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल हे अनेक रुग्णांना जीवदान देणारे ठरलेले असून येथे राज्य व परराज्यांतून मोठ्या प्रमाणात रुग्ण येत असतात.