आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंडपाच्या गोदामला लागलेल्या आगीत 40 लाखांचे नुकसान

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - काटवन खंडोबाकडे जाणार्‍या रस्त्यावरील सीना नदीलगत असलेल्या मळगंगा मंडप डेकोरेटर्सच्या गोदामाला लागलेल्या आगीत सुमारे 40 लाख रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ही आग लागली.

संजय लक्ष्मण आकुबत्तीन यांच्या मालकीच्या गोदामाला रात्री साडेदहाच्या सुमारास आग लागली. गोदामात मंडप, शामियाने, गाद्या, फर्निचर आदी साहित्य होते. काही वेळातच आगीने रौद्ररुप धारण केले. वारे वाहत असल्याने आग आणखी भडकली. गोदामात विजेचे कनेक्शन नसल्याने शॉर्टसर्किटचा प्रo्न नव्हता. आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही. गोदामातील सर्व साहित्य आगीत भस्मसात झाले.

परिसरातील लोकांनी आग शमवण्याचे प्रयत्न केले. मात्र, आगीच्या रौद्ररुपापुढे हे प्रयत्न निष्फळ ठरले. अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचण्यास विलंब झाल्याने सुमारे 40 लाखांचे नुकसान झाले. 12 बंब वापरल्यानंतर तब्बल दीड तासांनंतर आग आटोक्यात आली. पहाटे तीनच्या सुमारास आग पुन्हा भडकली. अग्निशमन दलाला पुन्हा पाचारण करण्यात आले. पहाटे 4 वाजता आग पूर्ण शमवण्यात यश आले. आगीमुळे लोखंडी अँगल व पत्रे वितळले.


विम्याचा लाभ नाही
मंडप डेकोरेटर्सचा विमा होता. मात्र, त्याची मुदत संपल्याने आकुबत्तीन यांना कोणताही लाभ मिळणे शक्य नाही. नुकतेच हे साहित्य आकुबत्तीन यांनी विकत घेतले होते. विम्याचे संरक्षण नसल्याने मोठा फटका त्यांना बसला. अग्निशमन विभागाकडे तातडीने धाव घेऊनही चालक नसल्याचे कारण पुढे करत अग्निशमन विभागाचे बंब पोहोचण्यास विलंब झाल्याचे आकुबत्तीन यांनी सांगितले.