आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कायनेटिक चौकातील चायनिज हॉटेलला आग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- नगर-पुणे रोडवरील कायनेटिक चौकातील चायनिज हाॅटेलला शनिवारी सकाळी आग लागली. सव्वा सात वाजेच्या सुमारास लागलेल्या या आगीत हॉटेलमधील फर्निचरसह इतर साहित्य जळून खाक झाले. दर्पण चायनिज असे या हॉटेलचे नाव असून ते दौंड रोडवर आहे. हॉटेलच्या मागील बाजूने धूर आल्यामुळे हॉटेलमध्ये बसलेल्या नागरिकांची भीतीने तारांबळ उडाली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
जीव वाचवून ग्राहकांनी हॉटेलच्या बाहेर पळ काढला. त्याच वेळी हॉटेलमध्ये असलेल्या फ्रीजचा स्फोट झाला. त्यापाठोपाठ गॅस शेगडीचाही स्फोट झाला. त्यामुळे आगीत भर पडून तिने मोठे स्वरुप धारण केले. या हॉटेलच्या शेजारी असलेल्या महाराज वडापाव बालाजी पान स्टॉल दुकानातील नागरिकही घाबरुन दुकानाबाहेर पळाले. या घटनेची माहिती नागरिकांनी अग्निशमन पथकाला कळवली. त्यामुळे अग्निशमन बंब तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
पाण्याचा मारा करुन आग विझवण्यात आली. चायनीज हॉटेलचे चालक दिनेश सपाटे, पंडित वडेवाले, बाबासाहेब आव्हाड, अशोक ठुबे, हेमंत निकम यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. आग विझवण्यासाठी अग्निशमन बंबाचे चालक कादीर शेख, अय्युब इनामदार, नाना सोलट, सादिक शेख, पांडुरंग झिने, यांनी शर्थीचे प्रयत्न केले.