आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राधाबाई काळे महिला महाविद्यालयात ‘फटाकेमुक्त दिवाळी’चा संकल्प

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - फटाक्यांमुळे होणारे दुष्परिणाम रोखण्यासाठी राधाबाई काळे महिला महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचा संकल्प केला. ‘दिव्य मराठी’ने फटाक्यांच्या दुष्परिणामांबाबत जागृती करणारे वृत्त प्रसिद्ध केले. त्याची दखल घेत विद्यार्थिनींनी यंदा फटाकेमुक्त दिवाळीची शपथ घेतली. फटाके कसे धोकादायक रसायनांपासून बनवले जातात, याची माहिती यावेळी विद्यार्थिनींना देण्यात आली.
महाविद्यालयातील प्राचार्य सर्व प्राध्यापक या उपक्रमात सहभागी झाले आहेत. प्राचार्य डॉ. भाऊसाहेब कराळे म्हणाले, समाजात चंगळवादाचा प्रभाव वाढला आहे. अशावेळी आपण सण-समारंभ आनंदाने साजरे केले पाहिजेत. ज्यांच्या घरात सणाचा सुगंधही पोहोचत नाही, त्यांचाही विचार करायला हवा. आरोग्य बिघडवणारे फटाके खरेदी करून आपण काय साध्य करतो? फटाक्यांवर हजारो रुपये खरेदी करून क्षणिक आनंद घेण्यापेक्षा वंचितांच्या मुखी दोन गोड घास घातले, तर तो आनंद चिरकाळ टिकणारा असतो. दैनिक दिव्य मराठीने फटाकेमुक्त दिवाळीचा स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे. आम्ही सर्व आज फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ घेत अाहोत, असे प्राचार्य कराळे यांनी सांिगतले. मराठी विभागातील प्रा. योगिता रांधवणे म्हणाल्या, दिवाळी म्हणजे आनंदाचा उत्सव. हा अानंद आपण इतरांना देत साजरा करायला हवा. फटाके फोडून प्रदूषणाला निमंत्रण देण्यापेक्षा पर्यावरणाचे संवर्धन झाले पाहिजे. फटाके खरेदी करण्यासाठी जेवढे पैसे लागतात, ते सर्व पैसे आपण सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांना मदत म्हणून द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

प्रदूषण टाळणार
^देशभर दिवाळीचा सण साजरा केला जातो. अनेक ठिकाणी फटाके फोडली जातात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. आम्ही मात्र यंदा फटाकेमुक्त दिवाळी साजरी करणार आहोत. फटाकेमुक्त दिवाळीसाठी "दिव्य मराठी'ने सुरू केलेला उपक्रम खूप चांगला आहे. फटाक्यांवर खर्च होणारे पैसे आम्ही गरजूंना मदत म्हणून देणार आहोत.'' अर्चना गवळी, विद्यार्थिनी.

समाजातील वंचित घटकांना करा मदत
^यंदा आम्ही फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचा संकल्प केला आहे. फटाक्यांसाठी व्यर्थ पैसे खर्च करता, हाच पैसा विधायक सामाजिक कार्यासाठी खर्च करणार आहोत. इतरांनीदेखील फटाकेमुक्त दिवाळी साजरी करावी. समाजातील वंचित घटकांच्या मदतीसाठी फटाक्यांचे पैसे खर्च करावेत.'' पूजा पिंपळे, विद्यार्थिनी.
बातम्या आणखी आहेत...