आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Firing Case Three Men Arrested In The Case Of Umapur

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उमापूर गोळीबार प्रकरणी श्रीरामपूरचे तीन जण अटकेत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीरामपूर - किरकोळ कारणावरून उमापूर (ता. गेवराई) येथे सोमवारी रात्री झालेल्या मारामारीदरम्यान श्रीरामपूरच्या सुलेमान आदमाने याने केलेल्या गोळीबारात एक तरुण गंभीर जखमी झाला. या घटनेनंतर गेवराईच्या पोलिस पथकाने श्रीरामपुरात छापे टाकून राहुल नानुस्कर, मंगेश बाबूराव पवार व परवेझ अजिज कुरेशी या तिघांना अटक केली.

याप्रकरणी सुलेमान आदमाने, इम्रान साजेद कुरेशी (श्रीरामपूर), अनिस कुरेशी, रफिक रहेमान कुरेशी, सोहेल रफिक कुरेशी (उमापूर) यांच्यासह अन्य तिघांविरुद्ध चकलांबा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

ईदनिमित्त उमापूर येथील मित्राकडे श्रीरामपूरचे आठ-दहा जण गेले होते. किरकोळ कारणावरून या त्यांचा शकल खाजा कुरेशी याच्याशी वाद झाला. रात्री हे सर्व जण उमापूरच्या रफिक कुरेशी, सोहेल कुरेशी यांच्यासह उमापूर-शेगाव रस्त्यावरील हॉटेल र्शेष्ठीत गेले. शकल कुरेशीही सहकार्‍यांबरोबर हॉटेलमध्ये होता. पुन्हा त्यांच्यात शाब्दिक चकमक झाली. आदमानेने गावठी पिस्तुलातून झाडलेल्या गोळीमुळे मोमेन कुरेशी (25, उमापूर) तो जखमी झाला होता.