आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ऊस आंदोलकांवरील गोळीबार; एक महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी पैठण डेपोची एसटी पेटवली होती. (संग्रहित फोटो) - Divya Marathi
आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी पैठण डेपोची एसटी पेटवली होती. (संग्रहित फोटो)

अहमदनगर- शेवगाव येथे ऊस दरासाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर झालेल्या गोळीबाराची चौकशी श्रीरामपूरचे प्रांतधिकारी करणार आहेत एक महिन्यात याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. 
 
शेवगाव-पैठण रस्त्यावरील घोटण, खानापूर, एरंडगाव कऱ्हेटाकळी आदी गावांत ऊस दरासाठी रास्ता रोको करण्यात आला होता. रस्त्यावर टायर, लाकडे जाळत पैठण डेपोची एसटीही पेटवण्यात आली होती. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराची नळकांडी फोडली होती. लाठीमारानंतर जमावाने पोलिसांच्या गाड्यांवर दगडफेक केली. या गोळीबारात दोन जण जखमी झाले होते. 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...