आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एकतर्फी प्रेमातून महिलेला जीवे मारण्याचा प्रयत्न; स्वत:वर गोळीत झाडून आत्महत्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विवाहित महिलेवर गोळीबार करुन नंतर आत्महत्या करणारा अमृतलाल पाल. - Divya Marathi
विवाहित महिलेवर गोळीबार करुन नंतर आत्महत्या करणारा अमृतलाल पाल.

नगर- प्रेमाला प्रतिसाद देत नसलेल्या विवाहित महिलेस जीवे मारण्याचा प्रयत्न करत स्वत:वरदेखील गावठी कट्ट्याने गोळी झाडून एका परप्रांतीय व्यक्तीने आत्महत्या केली. ही घटना शनिवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास विळद येथे घडली. अमृतलाल दुखीराम पाल (४२ , रा. अलाहाबाद, उत्तर प्रदेश) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात खुनाच्या गुन्ह्याचा प्रयत्न, आत्महत्या भारतीय हत्यार कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


विळद येथे रहात असलेल्या उत्तर प्रदेशातील एका विवाहित महिलेवर अमृतलाल याचे एकतर्फी प्रेम होते. ओळख असल्याने संबंधित महिलादेखील त्याच्याशी बोलत होती. अनेक दिवसांपासून त्यांचे बोलणे सुरू होते. मात्र, अमृतलाल आपल्यावर एकतर्फी प्रेम करत आहे, याची कल्पना संबंधित महिलेला नव्हती. अमृतलाल हा उत्तर प्रदेश येथील असून कामधंदाही तेथेच करतो. परंतु केवळ संबंधित महिलेची भेट व्हावी, या उद्देशाने तो नगरला अधूनमधून येत असे.


शनिवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास अमृतलाल संबंधित महिलेच्या घरी पोहोचला. त्यावेळी महिलेचा पती एमआयडीसीमध्ये कामाला गेलेला होता. ही संधी पाहून अमृतलालने आपल्या मनातील विचार महिलेला बोलून दाखवले. त्याचबरोबर विळद येथील पाण्याच्या टाकीजवळ भेटण्यासाठी बोलावले. मात्र, त्या महिलेने भेटण्यास नकार दिला, तेव्हा दोघांमध्ये वाद झाले. चिडलेल्या अमृतलालने उत्तर प्रदेश येथून आणलेल्या गावठी कट्ट्यातून महिलेच्या दिशेने गाेळी झाडली, गोळी महिलेच्या हाताला चाटून गेली. महिला िकरकोळ जखमी झाल्यानंतर अमृतलाल याने स्वत:वर गोळी झाडून घेतली. छातीवर गोळी झाडल्याने अमृतलाल जागीच ठार झाला. गोळीचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक जमा झाले. त्यानंतर हा सर्व प्रकार उघड झाला. एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. अमृतलालकडे गावठी कट्टा कसा आला, त्याने तो कोठून आणला, याचा तपास पोलिस करत आहेत. एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास चव्हाण करत आहेत. 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती...

बातम्या आणखी आहेत...