आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • First Time In India Free Online Education Through Video

नगरच्या युवकाचे जगाला मोफत ऑनलाइन धडे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- येथील डॉ. अनिल पालवे यांनी अमेरिकेच्या धर्तीवर भारतात प्रथमच व्हिडिओच्या माध्यमातून शिक्षणाची मोफत ऑनलाइन सुविधा सुरू केली असून १७५ देशांमधील ४९ हजार विद्यार्थ्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून शिक्षणाचे धडे गिरवण्यास सुरुवात केली आहे.
जिद्द असेल तर कुठलीही गोष्ट शक्य करून दाखवता येते, हे डॉ. पालवे यांनी सिद्ध करून दाखवले.
पाथर्डी तालुक्यातील शिवपूरसारख्या दुष्काळी भागातून आलेल्या डॉ. पालवे यांनी ग्रामीण भागातील मुलांना दर्जेदार अत्याधुनिक पद्धतीने शिक्षण मिळावे, यासाठी अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्रांनी अवलंबलेली ऑनलाइन शिक्षण पद्धत प्रथमच भारतात आणली. अमेरिकेत ऑनलाइन शिक्षणासाठी शुल्क आकारले जाते. मात्र, पालवे यांनी सर्वांसाठी मोफत अपारंपरिक शिक्षण ही संकल्पना राबवली. पहिलीपासून पदव्युतरपर्यंतचे शिक्षण ते ऑनलाइन पद्धतीने मोफत देतात. भारतासह जगातील प्रगत अप्रगत राष्ट्रांमधील विद्यार्थी सध्या त्याचा लाभ घेत आहेत.
डॉ. पालवे यांनी इंटरनेटवर dr.anil palve acadamy या नावाने यूट्यूब वर ७० व्हिडिओ टाकले आहेत. या व्हिडिओंच्या माध्यमातून कोणीही, कुठूनही शिक्षणाबाबत प्रश्न विचारू शकतो. त्या प्रश्नाचे उत्तर तातडीने दिले जाते. काही प्रश्नांची उकल झाल्यास व्हिडिओ पुन्हा पाहता येतो. या व्हिडिओला आतापर्यंत अमेरिकेसह १७५ देशांमधील ४९ हजार विद्यार्थांनी भेट देऊन प्रश्न विचारले आहेत. व्हिडिओ पाहणारे सर्वाधिक विद्यार्थी अमेरिकेतील आहेत. कंबोडिया या देशात दर्जेदार शिक्षण व्यवस्था नसल्याने तेथील विद्यार्थी या व्हिडिओचा सर्वाधिक लाभ घेत आहेत.
शिक्षण क्षेत्रात नावीन्यपूर्ण उपक्रमाचा ध्यास
- शिक्षण क्षेत्रात काही नावीन्यपूर्ण करण्याचा ध्यास होता. भारतात सध्या असलेली शिक्षण प्रणाली जुनी झाली आहे. सर्व क्षेत्रांत बदल झाले, मात्र भारतातील शिक्षण प्रणाली ५० वर्षांपूर्वी होती तशीच राहिली आहे. अध्ययन अध्यापन क्षेत्रात काही तरी नावीन्यपूर्ण करण्याचे मनात होते. अमेरिकेसह अन्य प्रगत राष्ट्रांमध्ये ऑनलाइन पद्धतीने शिक्षण दिले जाते. भारतात असे शिक्षण देण्याची संकल्पना मनात होती. अनेक वर्षे काम केल्यानंतर गेल्या वर्षी ही संकल्पना प्रत्यक्षात आली. यूट्यूबवर पहिलीपासून पदव्युत्तर शिक्षणाचे ७० व्हिडिओ टाकले आहेत. विशेष म्हणजे ही सुविधा मोफत आहे.''
डॉ. अनिल पालवे, शिक्षक.