आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सव्वापाच लाख क्विंटल साखरेचे जिल्ह्यात उत्पादन, १६ कारखान्यांचे गाळप सुरू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- यंदाच्या हंगामात आतापर्यंत सुरू झालेल्या १६ कारखान्यांनी लाख ४० हजार मेट्रिक टन उसाचे गाळप करून लाख २९ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन केले. आणखी दोन साखर कारखान्यांच्या गाळपाला दोन दिवसांत सुरुवात होत आहे. गेल्यावर्षी सर्वाधिक गाळप करणाऱ्या अंबालिका (इंडेकॉन) या खासगी कारखान्याने यंदाही गाळपात अव्वल स्थान राखले आहे.

गेल्या हंगामातील थकीत एफआरपीचा बोजा घेऊन जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी यंदाच्या गाळप हंगामाला सुरुवात केली होती. साईकृपा फेज-२ वगळता उर्वरित सात कारखान्यांनी थकीत एफआरपीचा बोजा कमी केला आहे, तर ११ कारखान्यांनी गेल्या हंगामातील थकीत एफआरपी शेतकऱ्यांना अदा केला आहे. अंबालिका जय श्रीराम या कारखान्यांनी ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात गाळपाला सुरुवात केली. उर्वरित कारखान्यांचे हंगाम गेल्या पंधरा दिवसांत सुरू झाले आहेत. जिल्ह्यातील १५ सहकारी साखर कारखान्यांपैकी पारनेर, केदारेश्वर डॉ. तनपुरे वगळता इतर १२ सहकारी साखर कारखाने यंदाच्या गाळप हंगामात सहभागी झाले आहेत. साईकृपा फेज-२ वगळता जिल्ह्यातील पैकी सहा खासगी कारखान्यांचे गाळप होणार आहे. त्यातील प्रसाद पीयूष (नगर तालुका) या कारखान्यांचे गाळप येत्या दोन दिवसांत सुरू होणार आहे.

अंबालिका कारखान्याने आतापर्यंत लाख ३८ हजार टन उसाचे गाळप करून लाख ४३ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. या कारखान्याचा सरासरी साखर उतारा साडेदहा टक्के आहे. दुसऱ्या क्रमांकावर गंगामाई हा खासगी साखर कारखाना आहे. गंगामाईने ७३ हजार ६४० टन उसाच्या गाळपातून ५५ हजार १५० क्विंटल साखरेचे उत्पादन केले. ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना गाळपात तिसऱ्या स्थानावर आहे. या कारखान्याने आतापर्यंत ६३ हजार टन गाळपातून ४४ हजार २०० क्विंटल साखरेची निर्मिती केली. कुकडी सहकारी साखर कारखान्याने ५७ हजार ९०० टन ऊस गाळपातून ५१ हजार ६०० क्विंटल साखर उत्पादित केली. श्रीगोंदे सहकारी साखर कारखान्याने ५१ हजार १७० टन उसाचे गाळप करून ४४ हजार ६७५ क्विंटल साखर तयार केली. जिल्ह्यात आतापर्यंत लाख ४० हजार टन उसाच्या गाळपातून लाख २९ हजार क्विंटल साखरेची निर्मिती झाली असून सरासरी साखर उतारा ८.२७ टक्के आहे.

एफआरपीबाबत उद्या पुण्यात होणार बैठक
साखरउद्योग अडचणीत असल्याचे कारण पुढे करून एकरकमी एफआरपी देण्यात असमर्थ असल्याचे कारखान्यांकडून दर्शवण्यात येत आहे. तीन टप्प्यांत एफआरपी देण्याची सवलत मिळवण्यासाठी कारखान्यांकडून प्रयत्न सुरू आहेत. कायद्यानुसार तसे करता येणार नसले, तरी समन्वयातून मार्ग काढण्यासाठी गुरुवारी (१९ नोव्हेंबर) सहकारमंत्र्यांच्या उपस्थितीत सर्व संबंधितांची पुण्यात बैठक होत आहे.

उपलब्ध उसात ३३ टक्के घट
गाळपासाठीउपलब्ध उसात गतवर्षीच्या तुलनेत यंदा एक तृतियांश (३३ टक्के) घट अपेक्षित धरण्यात आली आहे. गेल्यावर्षी कोटी २० लाख टन उसाचे गाळप झाले होते. मात्र, यंदाच्या हंगामासाठी ८० लाख टन ऊस उपलब्ध होईल, असा प्राथमिक अंदाज आहे. दुष्काळी परिस्थितीत घटलेले लागवड क्षेत्र, तसेच पावसाभावी चाऱ्यासाठी झालेली उसाची तोड यातून ही घट धरण्यात आली आहे.