आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीगोंदे तालुक्यात स्वस्त सोन्याचे आमिष दाखवून 5 लाख लुटले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून पुण्यातील एका व्यापार्‍यास श्रीगोंदे तालुक्यातील सांगवी येथे लुबाडण्यात आले. रविवारी सायंकाळी हा प्रकार घडला. पोलिसांनी तातडीने हालचाली करून चौघांना अटक केली असून त्यांच्याकडून अडीच लाखांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे.


अशोक मोरे, उल्हास मोरे (राहणार वाटलूज, दौंड), रमेश चव्हाण व राम चव्हाण (खोरवाडी, दौंड) अशी आरोपींची नावे आहेत. प्रमोद सुरेश गोपनारायण (ओंकार सोसायटी, हेवली, जि. पुणे) यांना स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून आरोपींनी रविवारी सांगवी परिसरात बोलावले. गुप्तधनातील सोने स्वस्तात घेण्यासाठी पाच लाख रोकड घेऊन ते साथीदारांसह आले.


आरोपींनी त्यांच्याजवळील रोकड हिसकावून घेतली, तसेच गोपनारायण व त्यांच्या साथीदारांनाही बेदम मारहाण करून पलायन केले. तातडीने ही माहिती पोलिसांना कळवण्यात आली. फौजदार अंकुश बोराटे यांनी वेगवान हालचाली करत चौघांना अटक केली. त्यांच्याकडून अडीच लाखांची रोकड हस्तगत करण्यात आली. ‘ड्रॉप’ नावाचा हा प्रकार श्रीगोंदा तालुक्यात सर्रास घडतो. तातडीने माहिती मिळाल्याने पहिल्यांदाच आरोपी जेरबंद करण्यात श्रीगोंदे पोलिसांना यश आले.