आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगर जिल्ह्यातील 5 भाविक ठार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाथर्डी- तिरुपती बालाजीचे दर्शन घेऊन रामेश्वरकडे निघालेल्या नगर जिल्ह्यातील भाविकांच्या गाडीने कंटेनरला दिलेल्या धडकेत पाच जण जागीच ठार झाले, तर तीन जण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये तिघे नगरचे तर मायलेकी तिसगावच्या आहेत.

गाडीतले सर्व प्रवासी जखमी असल्यामुळे गुरुवारी मध्यरात्री झालेल्या या अपघाताची माहिती शुक्रवारी दुपारी जिल्ह्यात धडकली. मृतांपैकी तिघे नगर येथील सावज कुटुंबातील तर दोन जणी तिसगाव येथील प्रतिष्ठित व्यापारी दिलीप गांधी यांच्या कुटुंबातील आहेत. तुषार विलास सावज ( 35), जयर्शी तुषार सावज (30), साहिल तुषार सावज (पाच वष्रे, सर्व रा.नगर), सारिका यशपाल गांधी (25), गीत यशपाल गांधी (तीन वष्रे, सर्व रा. तिसगाव) अशी मृतांची नावे आहेत. यशपाल दिलीप गांधी (30) व गीत यशपाल गांधी (तीन वष्रे) व युवराज तुषार सावज (आठ वष्रे) हे जखमी झाले असून यशपाल गांधी यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. तीन दिवसांपूर्वी घेतलेली नवीन डस्टर गाडी (एमएच 16 एटी 6050) घेऊन गांधी यांचा मुलगा व जावई तिरुपती बालाजीच्या दर्शनाला गेले. गाडीमध्ये एकूण आठजण होते. गुरुवारी बालाजीचे दर्शन घेऊन सर्वजण रामेश्वरकडे निघाले.

मध्यरात्री दोनच्या सुमारास मदुराई-चेन्नई राष्ट्रीय महामार्गावर उभ्या असलेल्या कंटेनरला डस्टर गाडीने जोराची धडक दिली त्यात पाच जण जागीच ठार झाले तर तिघे जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच तिसगाववर शोककळा पसरली.