आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुरक्षेच्या कारणास्तव साईंच्या दरबारात पुष्पगुच्छ नेण्यास बंदी, संस्थानाचा निर्णय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदनगर- सुरक्षेच्या कारणास्तव शिर्डीत साईबाबांच्या दरबारात यापुढे आता नारळाप्रमाणेच पुष्पगुच्छ नेण्यासही बंदी घालण्यात आली आहे. फुले, हार आणि प्रसाद नेण्यास मात्र कोणतीही बंदी नसणार आहे. साई संस्थानाने हा निर्णय घेतला आहे.
 
समाधी मंदिराच्या प्रवेशद्वारावर वापरलेले पुष्पगुच्छ पुन्हा विक्रीला येत असल्याचे साई संस्थानच्या निदर्शनास आले आहे. त्याचप्रमाणे अनेक भाविक पुष्पगुच्छ दुरुनच साईंच्या मूर्तीवर फेकत असल्याचेही दिसते. शिर्डीतील अपप्रवृत्तींना आळा घालण्याची मागणी ग्रामस्थांनीही संस्थानाकडे केली होती. सुरक्षेच्या कारणास्तव अखेर पुष्पगुच्छ नेण्यास बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 
 
पुढील स्लाईडवर पाहा आणखी फोटो आणि माहिती
बातम्या आणखी आहेत...