आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Flower News In Marathi, World Record, World Amazing Record, Divya Marathi

रविवारी तयार होणार शंभर प्रकारच्या फुलांचा विश्वविक्रमी हार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाचे आंतरराष्ट्रीय मुख्यालय ‘माउंट अबू’ येथे ‘परमात्मा अवतरण महोत्सव’ कार्यक्रमात दादी हृदयमोहिनी यांना विश्वविक्रमी हार अर्पण करण्यात येणार आहे. या उपक्रमाची नोंद ‘वर्ल्ड अमेझिंग रेकॉर्ड’मध्ये होईल. हा नयनरम्य सोहळा रविवारी (30 मार्च) रात्री आठ वाजता होणार असल्याची माहिती उपक्रमाचे संयोजक दीपक हारके यांनी दिली आहे.


माउंट अबू येथील व्यवस्थापिका ब्रह्मकुमारी मुन्नीदीदी हा विश्वविक्रमी हार दादी हृदयमोहिनी यांना घालणार आहेत. माउंट अबूतील शांतिवन येथील ‘डायमंड हॉल’मध्ये होणार्‍या या महोत्सवात जगातील 143 देशातील 35 हजार साधक सहभागी होणार आहेत. हा सोहळा जगभरातील साधक ‘पीस ऑफ माइंड’ या ब्रrाकुमारीजच्या वाहिनीवर पाहू शकतील. विश्वविक्रमी हार शंभर प्रकारच्या फुलांपासून तयार करण्यात येणार आहे. ही फुले बंगळुरू, पुणे, मुंबई या शहरांसह थायलंड, बँकॉक येथून मागवण्यात येणार आहेत. ‘शुभ फ्लॉवर्स’चे सचिन भुतारे देश-विदेशातील शंभर प्रकारच्या फुलांपासून विश्वविक्रमी हार तयार करणार आहेत. हार तयार करण्यासाठी शांतीकुमार फिरोदिया मेमोरियल फाउंडेशनचे सहकार्य लाभले आहे, असे हारके यांनी सांगितले. यापूर्वी हारके व प्रजापिता ब्रrाकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या सोनई (ता. नेवासे) सेवाकेंद्राच्या संचालिका ब्रrाकुमारी उषा यांनी संयुक्तपणे 77 प्रकारच्या फुलांचा हार तयार करून विश्वविक्रम केला होता. प्रजापिता ब्रrाकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाचे ध्यानधारणातज्ज्ञ दीपक हारके यांचा शंभर प्रकारच्या फुलांच्या हाराचा विक्रम हा दहावा विश्वविक्रम ठरणार आहे. यापूर्वी ‘शांती संदेश महारांगोळी’, ‘गांधीजींच्या वेशात विश्वबंधुता संदेश’, ‘300 मुलींचा विश्वबंधुता संदेश’, ‘जगातील सर्वात मोठा चषक’, ‘40 फुटी शिवलिंग’, ‘77 प्रकारच्या फुलांचा हार’, ‘सर्वात मोठे पुस्तक’, ‘201 फुटी वेडिंग बुके’, ‘203 फुटी पतंग’ असे विक्रम केले आहेत.


ही राहतील शंभर प्रकारची फुले
पाच विविध प्रकारची ग्लॅडो, 3 विविध प्रकारची आस्टर, 3 विविध प्रकारची झेंडू, 2 विविध प्रकारची शेवंती, 5 विविध प्रकारची जास्वंद, 8 विविध प्रकारची देशी गुलाब, 8 विविध प्रकारची डच गुलाब, 7 विविध प्रकारची कारनेशन, 8 विविध प्रकारची जरबेरा, 3 विविध प्रकारची ऑर्चिड, 5 विविध प्रकारची लिलियम, 3 विविध प्रकारची कमळ, बिजली, गलांडा, पासली, मोगरा, काकडा, सोनचाफा, गुलछडी, गुलमोहोर, तुळजापुरी झेंडू, लिली, जाई, जुई, ट्युलिप, कँटॉप, लेस, लास्पर, टगर, बटन शेवंती, किसानतिमम, चिप्सी, केवडा, कर्दळ, चेरी, चंद्रमुखी, डेलिया, अँथरियम, बीओपी, केला लिली, व्हाईट बॉटम, जोबा, टगर लिली, कोलका फूल, अप्पर जिता फूल, अबोली.