आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उड्डाणपुलाचा विषय पुन्हा गेला बासनात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - शहरातील स्टेशन रस्त्यावरील बहुचर्चित उड्डाण पुलाबाबत सर्वच स्तरावर सध्या शैथिल्य आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग ठेकेदारातील वादावर लवादासमोर सुनावणी सुरू आहे. बांधकाम विभागाने शासनाकडे पाठवलेले प्रस्ताव गेल्या नऊ महिन्यांपासून निर्णयाविना प्रलंबित आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा विषय किमान चर्चेत येण्याची अपेक्षा होती. मात्र, राजकीय पक्षही सध्या या प्रश्नावर शांतच आहेत.

नगर ते शिरूर राज्यमार्ग चौपदरीकरणाचा भाग असलेल्या स्टेशन रस्त्यावरील उड्डाणपुलावर गेल्या चार वर्षांपासून केवळ चर्चा, आश्वासने आंदोलनाचे गुऱ्हाळ सुरू आहे. या पुलाचे काम होण्यासाठी सर्वपक्षीय आंदोलनेही झाली. यात विरोधी पक्षांसह सत्ताधारी पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनीही भाग घेतला. मात्र, पुलाचे त्रांगडे काही सुटायला तयार नाही. लवादावर निर्णय सोपवून शासनाने अंग काढून घेतले आहे.

शिरूर ठरले सरस
शहरातीलउड्डाणपूल निविदेत समाविष्ट असतानाही आतापर्यंत हे काम झाले नाही. शिरूरचे तत्कालीन आमदार बाबुराव पाचारणे यांनी निविदेत समावेश नसतानाही शिरूरमध्ये तीन भुयारी रस्ते तयार करून घेतले. जिल्ह्यातील मातब्बर नेत्यांना मात्र हे जमले नाही.

आश्वासने हवेतच
महापालिकानिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरला आलेले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी उड्डाणपुलाचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत किमान चार-पाच वेळा बैठका होऊनही निर्णय झाला नाही.
(फोटो : गेल्या चार वर्षांपासून उड्डाणपुलाच्या प्रतीक्षेत असलेला स्टेशन रस्ता)