आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानगर - कर्जत तालुक्यातील बारडगाव दगडी येथील चारा घोटाळाप्रकरणी कर्जत पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध सोमवारी (28 ऑक्टोबर) रात्री फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या आदेशानंतर प्रशासनाने ही फिर्याद दिली.
कर्जतचे तहसीलदार जयसिंग बाबाजी भैसडे यांच्या फिर्यादीवरुन शिवाजी लक्ष्मण केसकर (तरडगाव) व शांतीलाल भीमराव काटे (खडकत, ता. आष्टी, जि. बीड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. 1284 टन चार्याचे वाटप न करता 35 लाख 31 हजार रुपयांचा गैरव्यवहार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. बारडगाव दगडी येथील चारा डेपोत गैरव्यवहार झाल्याचे माहितीच्या अधिकारात उघडकीस आले. दुचाकींवरुन नऊ ते बारा टन चारा वाहून आणल्याचे दर्शवून बिले काढण्यात आली. भाजपच्या व्यापारी सेलचे जिल्हाध्यक्ष अनिल शर्मा यांनी हे प्रकरण चव्हाट्यावर आणले. मागील हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षांनी यावर रान उठवले. गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी सीआयडीमार्फत चौकशी करुन कारवाईचे आश्वासन दिले. मात्र, कारवाई झाली नाही. त्यामुळे शर्मा यांनी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती.
तलाठी, मंडलाधिकार्यांविरुद्ध प्रशासकीय कारवाई
या घोटाळ्यात सहभाग आढळलेल्या मंडलाधिकारी व तलाठय़ांवर प्रशासकीय कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. खंडपीठाने संबंधितांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिलेले असतानाही सरकारी अधिकारी व कर्मचार्यांवर प्रशासकीय कारवाईची पळवाट प्रशासनाने काढली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.