आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निसर्गाचा प्रकोप - नगरमध्ये ढगाळ वातावरण, काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - शहर व परिसरात शनिवारी सकाळपासून ढगाळ वातावरणाने धुके वाढले. प्रचंड गारवा असलेल्या या धुक्यांनी व तुरळक पावसाच्या रिमझिम सरी, असे गोठवणारे वातावरण नगरकरांना अनुभवायला मिळाले. दाट धुक्यामुळे शहरातील वाहतूक धिम्या गतीने सुरू होती. थंडीच्या ऋतुमध्ये दुपारी बारा वाजेपर्यंत धुके राहण्याची ही वेळ वीस वर्षांनी अाल्याची माहिती ज्येष्ठांनी दिली.
गेल्या आठवड्यात तापमानाचा पारा दहा अंशाच्या खाली घसरल्याने नगरकरांना चांगलीच हुडहुडी भरली होती. साधारणत: असे वातावरण पावसाळ्यात अकोले तालुक्यातील सह्याद्रीच्या कुशीतील गावांत असते. तसा अनुभव नगरकरांनी घेतला. दोन दिवसांपासून हवामानात झालेल्या बदलामुळे थंडी कमी होऊन आकाशात ढग दाटून आले. कोणत्याही क्षणी जोरदार पाऊस होईल, असे वातावरण होते. त्यातल्या त्यात शुक्रवारी ऊनही होते.
शनिवारी मात्र पहाटेपासूनच वातावरणाचा नूरच पालटला. सकाळपासून नगर शहरात दाट धुके पसरल्याने शंभर फुटांच्या पुढे काहीच दिसत नव्हते. त्यामुळे वाहनचालकांनी दिवसा फॉग दिवे लावले, तरीही वाहतूक धिम्या गतीने सुरू होती. महामार्गांवरील वाहतूकही धुक्यामुळे कोलमडून गेल्याचे चित्र होते. धुक्याबरोबरच पावसाचे तुषारसिंचन सुरू असल्याने काही नागरिक रेनकोट परिधान करून बाहेर पडले. थंडी व धुक्यामुळे अनेक नागरिकांनी सकाळी फिरायला बाहेर पडायचे टाळले. दुपारी बारा वाजता सूर्यदर्शन झाल्यानंतर धुके विरळ होऊन वाहतूक सुरळीत सुरू झाली.
दुपारी बारापर्यंत धुके व कडाक्याची थडी असल्याने सकाळी साडेअकराच्या सुमारासही नगरमध्ये काही ठिकाणी शेकोट्या पेटवून नागरिकांनी त्याभोवती गप्पांचा आनंद लुटला. आज सर्वत्र चर्चा होती, ती फक्त थंडी व धुक्याचीच. ईदच्या सुटीमुळे शाळा बंद असल्याने थंडीचा व धुक्याचा कडाका विद्यार्थ्यांना सहन करावा लागला नाही.

ही स्थिती फक्त नगर शहरातच नव्हती, तर िजल्हाभर होती. नगर तालुक्यात खडकी परिसरात हलका पाऊस झाला. नेवासे तालुक्यात थंडीबरोबर पावसाच्या हलक्या सरीही कोसळल्या. पावसाबरोबर वादळ नसल्याने शेतकऱ्यांनी थोडा दिलासा मिळाला आहे. कारण वादळाने उभी पिके आडवी होण्याची भीती आहे.

ज्वारीला फटका बसणार
^ओलावा जास्त काळ टिकून राहिल्यास किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. कणसांवर पाणी साचल्याने ज्वारीच्या दाण्याचा रंग लालसर होऊ शकतो. हरभरा पिकावर घाटेअळी पडण्याची शक्यता आहे. ज्वारीवर मावा व चिकटा, गव्हावर तांबेरा, कांद्याला कर्पा प्रादुर्भाव होऊ शकतो.'डॉ. रवी आंधळे, साहाय्यक प्राध्यापक, राहुरी कृषी विद्यापीठ

थंडीची लाट पुन्हा येणार
^२ जानेवारीला इंडोनेशियात तयार झालेले चक्रीवादळ शनिवारी ऑस्ट्रेलियाकडे दिशेने निघाले, त्यामुळे आपल्याकडील बाष्प तिकडे ओढले जाऊन महाराष्ट्रात उत्तरेकडील थंड हवेची लाट पसरणार आहे. त्यामुळे रविवारी तापमानाचा पारा १२ अंशाहून सात अंशापर्यंत घसरण्याची शक्यता आहे.'' बी. एन. शिंदे, हवामान अभ्यासक.