आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विविध खाद्यसंस्कृतींची इथे होईल ओळख, प्रजासत्ताक दिनी हॉटेल संजोगमध्ये फूड फेस्टिव्हल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - काश्मिरपासून कन्याकुमारीपर्यंत विविध प्रांतात असलेली खाद्यसंस्कृती अनुभवण्याची संधी नगरकरांना प्रजासत्ताक दिनी घेता येईल. "भारत भारती'च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या फूड फेस्टिव्हलमध्ये खवय्यांना अनेकविध पदार्थांची चव चाखता येईल. त्यासोबत प्रत्येक प्रांताचे वऔशिष्ट्य असलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंदही घेता येईल.
नगर शहराला ५२५ वर्षांचा इतिहास लाभला आहे. निजामशाही काळात नगरहून धान्य, कापड, दारूगोळा यांची आयात-निर्यात होत असे. नगर हे महत्त्वाचे लष्करी शऔक्षणिक केंद्र होते. त्यामुळे अरब देश, इराण, तसेच अन्य देशांतील लोक नगरला येत असत.

सध्या नगर शहरात देशातील विविध प्रांतांतील रहिवाशांचे वास्तव्य आहे. जम्मूू काश्मिर, हिमाचल प्रदेश, उत्तरप्रदेश, राजस्थान, गुजरात, ओरिसा, पश्चिम बंगाल, ओरिसा, कर्नाटक, आंध्रप्रदेश, केरळ, तमिळनाडू, तसेच ईशान्येकडील राज्यांतील नागरिक नोकरी उद्योग-व्यवसायानिमित्त नगरमध्ये वास्तव्यास असतात. परप्रांतातील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी नगरमध्ये राहतात. लष्कराच्या अनेक आस्थापना नगरला असल्याने विविध प्रांतांतील जवान अधिकारी आपल्या आयुष्यातील काही काळ नगरमध्ये व्यतित करतात.

यातील काही परप्रांतीय नगरमध्येच स्थायिक झाले असून त्यांची दुसरी, तिसरी पुढी नगरमध्ये वाढत आहे. अनेक दाक्षिणात्य मंडळी नगरमध्ये स्थिरावली आहेत. त्यांनी आपली संस्कृतीही येथे आणली आहे. आपल्या राज्यातील सण ते मोठ्या उत्साहाने आपल्या भाषेत, आपल्या पद्धतीने साजरे करतात.

वेगवेगळ्या प्रदेशांतील मंडळींनी एकत्र येऊन "भारत भारती' या संघटनेची स्थापना केली आहे. दरवर्षी २६ जानेवारीला ही मंडळी एकत्र येऊन विविध कार्यक्रम सादर करतात.

यंदा हॉटेल संजोगमध्ये सायंकाळी साडेपाच वाजता होणाऱ्या कार्यक्रमास सहकार मंत्री चंद्रकांत पाटील, जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे, तसेच गुजराथमधील गांधीनगर येथील कामधेनू विद्यापीठाचे कुलगुरू मदन गोपाल वार्ष्णेय प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबर त्या त्या प्रांतांतील खाद्यपदार्थ असलेला फूड फेस्टिव्हलही आयोजित करण्यात आला आहे.

सुमारे दहा हजारांहून अधिक नगरकर या कार्यक्रमात सहभागी होतात. याही वेळी नगरकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन "भारत भारती'चे अध्यक्ष के. के. शेट्टी, उपाध्यक्ष कॅप्टन आनंदसिंग रावत, दामोदर बठेजा, सचिव मिलिंद कुलकर्णी, प्रदीप पंजाबी, अशोक मवाळ, चंद्रशेखर आरोळे, संजय आडेप, समीर बोरा, वाल्मिक कुलकर्णी, राजाभाऊ जोशी, विजय हेगडे संयोजन समितीने केले आहे.

सरदारांची स्मृती
१९४२च्या आंदोलनात सरदार पटेल अन्य राष्ट्रीय नेत्यांना सुमारे पावणेतीन वर्षे नगरच्या किल्ल्यात स्थानबद्ध करण्यात आले होते. हा त्यांच्या आयुष्यातील शेवटचा सर्वात दीर्घ कारावास होता. सरदारांच्या स्मरणार्थ टिळक रस्त्यावरील पटेल मंगल कार्यालयापासून २६ ला सायंकाळी वाजता शोभायात्रा काढण्यात येईल.

राष्ट्रप्रेमाचे उपक्रम
- "भारतभारती'च्या माध्यमातून राष्ट्रप्रेम वाढवणारे उपक्रम आयोजित केले जातात. भारतमातेच्या पोटी जन्मलेल्या थोर पुरूषांची ओळख नव्या पिढीला व्हावी, म्हणून स्वामी विवेकानंद, गुरू गोविंदसिंह यांची जीवनगाथा लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न यापूर्वी करण्यात आला.'' वाल्मिककुलकर्णी, संघटक,भारत भारती
राष्ट्रीय एकात्मता