आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी प्रत्येकानेच झाडे लावणे आवश्यक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- पूर्वजांनी झाडे लावली, म्हणूनच आज आपल्याला त्यांची सावली मिळत आहे. प्रत्येकाने आपल्या येणाऱ्या पिढ्यांसाठी झाडे लावणे ती जगवणे आवश्यक आहे. पर्यावरणाच्या संतुलनासाठी सर्व माळरानांवर वृक्षारोपण होणे आवश्यक आहे. मी माझ्या सामाजिक राजकीय जीवनाची सुरुवात वृक्षारोपणासारख्या उपक्रमाने केली. आनंदधाम रस्त्यावर प्रेरणा प्रतिष्ठानमार्फत केलेले वृक्षारोपणामुळे परिसराच्या वैभवात भर पडली आहे. अभिषेक कळमकर यांनी आपल्या वाढदिवस डामडौल करता सामाजिक उपक्रमांनी सर्वसामान्यांकरिता योगदान देऊन साजरा करून आदर्श निर्माण केला आहे, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले. 
 
माजी महापौर नगरसेवक अभिषेक कळमकर यांच्या वाढदिवसानिमित्त मिरावली पहाड येथील जांभूळबनमधील रोपांना टँकरद्वारे पाणी देण्यात आले. मागील वर्षी डोके फाउंडेशनचे संस्थापक बलभीम डोके यांच्या मार्गदर्शनाखाली ६० झाडे लावून जांभूळबन तयार करण्यात आले आहे. यावेळी माजी आमदार दादा कळमकर, बलभीम डोके, कँटोन्मेंट मंडळाचे उपाध्यक्ष मुसा सय्यद, माजी समाज कल्याण अधिकारी रफिक मुन्शी, डॉ. रिझवान शेख, संजय सपकाळ, रफिक रंगरेज आदी अनेक मान्यवर उपस्थित होते. 
 
कळमकर म्हणाले, मिरावली पहाड हे सर्वधर्मियांचे श्रद्धास्थान आहे. संपूर्ण राज्यातून येथे भाविक येतात. डोके फाउंडेशनने येथील डोंगर हिरवागार व्हावा, या उद्देशाने येथे जांभूळबन तयार केले आहे. पाण्याच्या कमतरतेमुळे टँकरद्वारे झाडांना पाणी द्यावे लागते. अभिषेक कळमकर यांच्या वाढदिवसानिमित्त येथील झाडांकरिता टँकर उपलब्ध करून दिला. यापुढील काळात सर्वांचे वाढदिवस या ठिकाणी टँकरद्वारे झाडांना पाणी देण्याच्या उपक्रमांनी साजरे केले जातील.
 
डोके म्हणाले, मागील वर्षी लावलेली सर्व झाडे उत्कृष्ट देखभालीमुळे जगली आहेत. पाण्याच्या अभावामुळे नगरहून टँकरद्वारे पाणी द्यावे लागते. नागरिकांनी या झाडांकरिता टँकर उपलब्ध करून द्यावेत. एक झाड जगवले, तर १६ सहस्र नामजपाचे पुण्य लाभते. त्यामुळे नागरिकांनी जास्तीत जास्त सामाजिक जाणिवेतून वृक्षारोपण वृक्षसंगोपनाला महत्त्व द्यावे. आगामी काळात आणखी झाडे लावली जातील, असे ते म्हणाले. 
 
माजी महापौर नगरसेवक अभिषेक कळमकर यांच्या वाढदिवसानिमित्त मिरावली पहाड येथील जांभूळबनमधील रोपांना टँकरद्वारे पाणी देण्यात आले. या वेळी आमदार संग्राम जगताप, दादा कळमकर उपस्थित होते. 
बातम्या आणखी आहेत...