आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षक बँकेसाठी ९,८५९ मतदार पात्र, दहा दिवसांत निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुकीसाठीची अंतिम यादी बुधवारी जाहीर झाली. प्रारूप यादीच्या तुलनेत अवघ्या तीन नवीन मतदारांची भर अंतिम मतदारयादीत पडली असून आता मतदार संख्या हजार ८५९ झाली आहे. येत्या दहा दिवसांत निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता असल्याने गुरुजींना प्रचारासाठी कमी वेळ उरला आहे.

जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या संचालक मंडळाची मुदत जानेवारीअखेर संपणार आहे. या पार्श्वभूमीवर सहकारी विभागाचे जिल्हा उपनिबंधक दिगंबर हौसारे यांनी पुढील कार्यवाही सुरू केली आहे. काही दिवसांपूर्वीच हजार ८५६ मतदारांची प्रारूप यादी जाहीर करण्यात आली. त्यानंतर हरकती घेण्यासाठी मुदत देण्यात आली होती. बुधवारी आलेल्या हरकतींचा विचार करून नवीन मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली. प्रारूप यादीवर एकूण हरकती घेण्यात आल्या होत्या. हरकतींची संख्या कमी असल्याने मतदारयादीत फारसा बदल झालेला नाही. अवघ्या तीन नवीन मतदारांचा अंतिम यादीत समावेश होऊन ही संख्या हजार ८५९ पर्यंत पोहोचली आहे.
जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या एकूण २१ जागांसाठी जानेवारीअखेर निवडणूक रंगणार आहे. यादी अंतिम झाल्याने दहा दिवसांत अधिसूचना निघण्याची शक्यता आहे. गुरुजींनी राखीव जागांसह तालुक्यातील उमेदवारांकडे लक्ष केंद्रित केले आहे. कोणत्याही परिस्थितीत बँकेत बदल घडवण्याचा चंग बांधणारे बँकेचे विरोधक चांगलेच फार्मात आहेत. प्रत्येक सभासदाला आमचीच सत्ता येईल, असे ते ठासून सांगत आहेत, तर सत्ताधारी सदिच्छा मंडळ केवळ सत्तेसाठी विरोधकांनी बदनामी केल्याचा प्रचार करत आहे. खालच्या पातळीवर टीका करून एकमेकांची उणीदुणी काढण्यासाठी वैयक्तिक माहिती दोन्ही मंडळांनी मिळवली आहे. त्यामुळे प्रत्यक्ष सभा सुरू होताच त्याची चुणूकही दिसून येईल.

दरम्यान, निवडणुकीची प्रत्यक्ष रणधुमाळी सुरू होण्याआधीच वेगवेगळ्या गटांनी गुप्त बैठका घेऊन मतांची जुळवाजुळव सुरू केली आहे. मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी वेगवेगळे फंडे वापरले जात असून त्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च केला जात आहे.

आपसी बदली झालेले ते ७० शिक्षक अधांतरी...
महिनाभरापूर्वी जिल्ह्यातील ७० प्राथमिक शिक्षकांच्या आपसी बदल्या झाल्या. बँकेच्या पोटनियमानुसार पात्र सभासद ज्या तालुक्यात नोकरी करतो, त्याच तालुक्यातून त्याला निवडणूक लढवता येते. या बदलीमुळे ज्या शिक्षकांचा तालुका बदल झाला, अशा शिक्षकांना अपवाद वगळता बदलीपूर्वीच्या मूळ तालुक्यात गृहित धरण्यात आले. त्यामुळे हे मतदार अधांतरीच आहेत.

तालुकानिहाय मतदार
संगमनेर हजार ४९, नगर ७३१, पारनेर ८३०, कोपरगाव ५०९, श्रीरामपूर ३८९, जामखेड ३४४, पाथर्डी ७९९, राहुरी ६६५, शेवगाव ५३१, श्रीगोंदे ९३९, अकोले ९७८, नेवासे ८२९, कर्जत ५७४, राहाता-कोपरगाव २९६, श्रीरामपूर - राहाता २३६, नगरपालिका १८१, भिंगार कँन्टोन्मेंट २६, नॉन टिचिंग ३० अशी तालुकानिहाय शिक्षक मतदारांची संख्या आहे.